ढिगारा कोसळून एकाचा मृत्यू

By Admin | Updated: July 5, 2014 00:14 IST2014-07-05T00:14:27+5:302014-07-05T00:14:27+5:30

वाढेगाव येथील घटना : महिन्यात लागोपाठ दुसरी घटना

Death of one of the collapses collapses | ढिगारा कोसळून एकाचा मृत्यू

ढिगारा कोसळून एकाचा मृत्यू



वाढेगाव : सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम सुरू असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळून एक जण जागीच ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. वाढेगाव (ता. सांगोला) येथे वाढेगाव-सावे रोडनजीक शुक्रवारी दुपारी १२़३० वाजता ही घटना घडली.
विठोबा वसराम जाधव (वय ५०, रा. वलडसंग, ता. होर्ती, जि. विजापूर) असे मयताचे नाव असून, महादेवी विठोबा जाधव (वय १५) व सुभाष नामदेव जाधव (वय ३०, रा. वलडसंग, ता. होर्ती, जि़ विजापूर) ही जखमींची नावे आहेत.
यापूर्वी २० जून रोजी विहिरीचा कठडा कोसळून सात जणांचा बळी गेला होता. ही घटना ताजी असतानाच आज दुपारी दुसरी घटना घडली.
वाढेगाव-सावे रस्त्यालगत (संजयनगर) येथील जि़ प़ प्राथमिक शाळेच्या पाठीमागे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत नाला सरळीकरण व सिमेंट नालाबंडिंगचे काम सुरू आहे. या बंधाऱ्याची खोली १५ ते २० फुटाच्या आसपास आहे. विजापूर व वाढेगाव येथील मजूर या कामावर आहेत. भिंतीचे बांधकाम सुरू असताना शुक्रवारी दुपारी अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने त्याखाली दबून विठोबा वसराम जाधव यांचा मृत्यू झाला.
जखमींवर सांगोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी सांगोल्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील, पो. नि. अजय कदम यांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. तासानंतर जेसीबी व ग्रामस्थांच्या साहाय्याने गाडला गेलेला मृतदेह काढण्यात प्रशासनाला यश आले.
---------------------
म्हणून ते चौघे बचावले़़़
अचानक झालेल्या घटनेमुळे कामावरील मजुरांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी असलेले बिंडू दिघे, साहेबराव दिघे, विनायक मोरे, श्रीकांत दिघे यांच्यासह अन्य कामगारांनी महादेवी विठोबा जाधव व सुभाष नामदेव जाधव या दोघांना मातीच्या ढिगाऱ्यातून काढल्याने ते बालंबाल बचावले. तसेच या ठिकाणी पाच मजूर काम करीत होते. मात्र टमटममध्ये बंधाऱ्याच्या कामासाठी लागणारी सळई आणल्यानंतर त्यातील विनायक मोरे व श्रीकांत दिघे हे मजूर वाहनातील सळई काढण्यासाठी वर आल्याने ते दोघे बचावले.
--------------------------------
दोन्ही दुर्घटना शुक्रवारीच
यापूर्वी २० जून रोजी शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली होती़ आजही शुक्रवार आणि वेळही दुपारी १२.३० ची होती. या दोन्ही घटना घडल्या त्याची वेळ आणि वार एकच होता़

Web Title: Death of one of the collapses collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.