कमलाबाई दंडवते यांचे देहावसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:26 IST2021-08-22T04:26:28+5:302021-08-22T04:26:28+5:30

सोलापूर : श्रीक्षेत्र गाणगापूर येथील दंडवते संस्थानच्या मातोश्री श्रद्धेय पूज्य कमलाबाई प्रभुराज दंडवते यांना सोलापूर संस्थानात ...

Death of Kamalabai Dandwate | कमलाबाई दंडवते यांचे देहावसान

कमलाबाई दंडवते यांचे देहावसान

सोलापूर : श्रीक्षेत्र गाणगापूर येथील दंडवते संस्थानच्या मातोश्री श्रद्धेय पूज्य कमलाबाई प्रभुराज दंडवते यांना सोलापूर संस्थानात शनिवार, २१ ऑगस्ट रोजी दुपारी देवाज्ञा झाली. त्या सद्गुरू चरणी लीन झाल्या. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या मागे गाणगापूर पीठाधीश योगीराज महाराज, हैदराबाद मठाचे आनंदमूर्ती आणि सोलापूर स्थानाचे गोविंदराज महाराज हे तीन सुपुत्र, स्नुषा, चार कन्या, जावई, नातवंडे आणि मोठा भक्त परिवार आहे. श्रीक्षेत्र गाणगापूर येथे रविवारी सकाळी ११ वाजता अंत्यविधी होणार आहे. रविवारी सकाळी ९ ते ११ पर्यंत श्रीक्षेत्र गाणगापूर स्थानी त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यांनी गुरुनाथ बाबांची दीर्घ काळ श्रद्धापूर्वक सेवा केली. गाणगापूर, हैदराबाद आणि सोलापूर या तिन्ही मठांतील सर्व उत्सव, अनुष्ठान, उपासना यामध्ये त्यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा लाभत असे.

-----

२१ कमलाबाई दंडवते

Web Title: Death of Kamalabai Dandwate