दुचाकी अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:37 IST2021-05-05T04:37:05+5:302021-05-05T04:37:05+5:30
रंभाजी पाटील हे ३ मे रोजी रात्री जेवण झाल्यानंतर महूद-सांगोला रस्त्यावर शतपावली करीत होते. रात्री ७:४५च्या सुमारास त्यांना ...

दुचाकी अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
रंभाजी पाटील हे ३ मे रोजी रात्री जेवण झाल्यानंतर महूद-सांगोला रस्त्यावर शतपावली करीत होते. रात्री ७:४५च्या सुमारास त्यांना दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना अकलूज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
रंभाजी पाटील हे माजी आ.गणपतराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी होते. त्यांनी सांगोला पंचायत समितीचे सभापती, महूद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, महूदचे उपसरपंच, महूद परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक संचालक, श्री शिवाजी विद्यालय स्थानिक सल्लागार सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. शेकापचे गटनेते बाळासाहेब पाटील, आदर्श प्राथमिक शिक्षक संघटनेचे रवींद्र पाटील यांचे ते चुलत बंधू होत.