पंढरपुरातील चंद्रभागा नदीत बुडून नांदेडच्या भाविकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:34 PM2019-03-31T12:34:23+5:302019-03-31T12:38:35+5:30

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील घटना

Death of a devotee of Nanded drowned in Chandrabhaga in Pandharpur | पंढरपुरातील चंद्रभागा नदीत बुडून नांदेडच्या भाविकाचा मृत्यू

पंढरपुरातील चंद्रभागा नदीत बुडून नांदेडच्या भाविकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देपंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी नांदेडहुन आले होते भाविकरविवारी पहाटेच्या सुमारास घडली घटनापंढरपूर पोलीस ठाण्यात झाली नोंद

पंढरपूर : रविवारी पहाटेच्या ५ वाजण्याच्या सुमारास चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी गेलेला एक भाविक नदीपात्रातील बुडून बेपत्ता झाला आहे. गोविंद जनार्धन सुवर्णकार (वय २७, रा. देगलूर, ता. जि. नांदेड) असे त्याचे नाव आहे. याबाबत सुवर्णकार कुटुंबीयांना पोलिसांना माहिती दिली आहे. 


नांदेड जिल्ह्यातील सुवर्णकार कुटुंबीय रविवारी सांगोला येथे नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यास जाणार होते़ पहाटे चंद्रभागेचे स्नान करून विठोबाचे दर्शन घेऊन सांगोल्याला जाण्याचा त्यांचा विचार होता, परंतु पहाटे आंघोळीसाठी नदीपात्रात गेलेला गोविंद सुवर्णकार बुडाल्याने या कुटुंबावर आघात झाला असून पोलिसांना याची माहिती दिली आहे.बुडालेल्या भाविकांचा शोध कोळी समाजातील तरूण होडीचालकांच्या मदतीने घेत आहेत. 


नदीपात्रात अद्याप शोधकार्य सुरू आहे. नुकतेच उजनीतून पाणी सोडल्याने चंद्रभागेचे पात्र भरुन वाहत आहे. अवैधरित्या वाळू उपसा केल्याने नदीपात्रात अनेक मोठ मोठे खड्डे पडले आहेत़ त्यामुळे स्नानासाठी गेलेल्या गोविंद यास पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Web Title: Death of a devotee of Nanded drowned in Chandrabhaga in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.