पडिक विहिरीत पडून ढाब्यावरील आचाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST2021-09-09T04:27:56+5:302021-09-09T04:27:56+5:30

भीमाशंकर सिद्धणा पाटील (वय ३३, रा. बिंजगेर, ता. अक्कलकोट) असे आचाराचे नाव आहे. मैंदर्गीजवळील एका चहा कॅन्टीनच्या पाठीमागील जाधव ...

Death of conduct on Dhaba after falling into Padik well | पडिक विहिरीत पडून ढाब्यावरील आचाराचा मृत्यू

पडिक विहिरीत पडून ढाब्यावरील आचाराचा मृत्यू

भीमाशंकर सिद्धणा पाटील (वय ३३, रा. बिंजगेर, ता. अक्कलकोट) असे आचाराचे नाव आहे. मैंदर्गीजवळील एका चहा कॅन्टीनच्या पाठीमागील जाधव यांच्या शेतात तीस फूट खोल विहीर आहे. त्या विहिरीत सकाळीच एक व्यक्ती पडल्याचे समजले. ही माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस अंमलदार एजाज मुल्ला, सुनील माने, अस्लम पटेल आदीनी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत चंद्रकांत शंकर पाटील यांनी खबर दिली आहे. मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करून सायंकाळी बिंजगेर या मूळगावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अधिक तपास सुनील माने हे करीत आहेत. मृत भीमाशंकर पाटील यांच्या हातावर बी.आर. असे टॅटूने कोरल्याने त्याची ओळख पटली. यावरून ग्रामस्थांना ओळख पटली आहे. दारूच्या नशेत त्याने विहिरीत उडी मारल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

.......

(फोटो :०८अक्कलकोट पाटील

Web Title: Death of conduct on Dhaba after falling into Padik well