शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अष्टपैलू कामगिरी करत ‘दयानंद’ने मारली बाजी

By appasaheb.patil | Updated: September 23, 2019 12:22 IST

सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव; बार्शीचे शिवाजी महाविद्यालय दुसºया स्थानावर; सोलापूर विद्यापीठ अधिविभाग तृतीय

ठळक मुद्दे- सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचा समारोप- दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयास सर्वसाधारण विजेतेपद- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अधिविभागास मिळाले यश

सोलापूर :  दरवर्षी येणारा सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव आणि बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाकडे जाणारे विजेतेपद हे जणू एक अतुट नातेच निर्माण झाले होते. मात्र, यंदा बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयास मागे टाकत सोलापुरातील दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले. त्यामुळे बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाला दुस्ºया स्थानावर समाधान मानावे लागले. 

दयानंद महाविद्यालयाने लोकमंगल महाविद्यालय वडाळा येथे झालेल्या १६ व्या युवा महोत्सवात पथनाट्य, मूकनाट्य, फोक आॅर्केस्ट्रा, समूहगीत, प्रश्नमंजूषा या सांघिक तर मातीकाम, वक्तृत्व इंग्रजी, शास्त्रीय गायन या वैयक्तिक कलाप्रकारात आपली वेगळी छाप उमटवली. तसेच लघुनाटिका, एकांकिका, रांगोळी, स्पॉट फोटोग्राफी, वक्तृत्व हिंदी, वादविवाद, सुगम गायन यात द्वितीय तर कातरकाम, भित्तीचित्रण, स्थळचित्रण, शास्त्रीय तालवाद्य या कलाप्रकारातही महाविद्यालयाने चांगले यश संपादन केले. याशिवाय पूजा काटकर हिच्या रुपाने ‘गोल्डन गर्ल’ व शुभम रणखांबे त्याच्या रूपाने ‘गोल्डन बॉय’चा किताब पटकाविला. 

याशिवाय बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकाविले असून, या महाविद्यालयाच्या संघाने रांगोळी, व्यंगचित्र, भित्तीचित्रण, स्थळचित्रण, सूगम गायन, समूहगीत, मूकनाट्य, शास्त्रीय सूरवाद्य, शास्त्रीय गायन, कातरकाम, एकांकिका, वक्तृत्व इंग्रजी या कलाप्रकारात आपला दबदबा कायम ठेवला. याशिवाय वाङ्मय विभागात शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय, अकलूज, नाट्य विभागात अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, नृत्य विभागात डी. ए. व्ही. वेलणकर महाविद्यालय, सोलापूर तर संगीत विभागात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूरने विजेतेपद पटकावले.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात येणाºया या युवा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. आज मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून हिम्मत दाखवली. एक प्रकारची ऊर्जा या माध्यमातून निर्माण झाली आहे. विद्यापीठ सातत्याने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असते, असे सांगून विद्यार्थ्यांचे अभिनंदन त्यांनी यावेळी केले.

पारितोषिक वितरणाचे वाचन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून पूजा खपाले आणि पूजा काटकर यांनी तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रा. ममता बोल्ली यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य श्रीकांत धारूरकर यांनी केले तर आभार डॉ. वसंत कोरे यांनी मानले.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरcollegeमहाविद्यालयEducationशिक्षणmusicसंगीत