वटपौर्णिमेच्या दिवशीच मद्यपी पतीकडून पत्नीवर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:17 IST2021-06-25T04:17:00+5:302021-06-25T04:17:00+5:30

अक्कलकोट : वटपौर्णिमेच्या दिवशी जन्मोजन्मी हाच पती मिळो, अशी मागणी करणाऱ्या पत्नीला पतीने दारुच्या नशेत धारधार शस्त्राने वार केला ...

On the day of Vatpoornima, an alcoholic husband attacked his wife | वटपौर्णिमेच्या दिवशीच मद्यपी पतीकडून पत्नीवर वार

वटपौर्णिमेच्या दिवशीच मद्यपी पतीकडून पत्नीवर वार

अक्कलकोट : वटपौर्णिमेच्या दिवशी जन्मोजन्मी हाच पती मिळो, अशी मागणी करणाऱ्या पत्नीला पतीने दारुच्या नशेत धारधार शस्त्राने वार केला आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी असून तिला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गुरुवारी २४ जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वागदरी रस्त्यावर सिद्धेश्वर ढाब्याजवळ ही घटना घडली.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार अक्कलकोट शहरात माणिकपेठेतील जनता चाळ येथील संभाजी विष्णू पाटोळे (४०) हा पत्नी पूनम आणि दोन लहान मुली यांना मोटारसायकलवर बसवून वागदरी (ता. अक्कलकोट) मार्गे अक्कलकोटकडे येत होता. दरम्यान अक्कलकोटपासून तीन किलोमीटर अंतरावर सिद्धे यांचा ढाबा आहे. या ढाब्याच्या मागे दावल मलिक दर्गा आहे. तेथे पत्नीला घेऊन गेल्यानंतर धारधार शस्त्राने अंगावर वार केले. मद्यपान करुन हे कृत्य केल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शीमध्ये झाली.

या घटनेवेळी तिन्ही लहान मुली या ओक्साबोक्सी रडत होत्या. ही घटना रस्त्यावरुन जाणाऱ्या काही लोकांच्या निदर्शनास आली. त्यांनी तिला मदत करीत शासकीय रुग्णालयात हलवण्यास केली. या घटनेची माहिती मिळताच उत्तर पोलीस ठाण्यात पथक वाहन घेऊन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या महिलेची प्रकृती गंभीर असून तिला पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

---

स्वत:वर करुन घेतले वार

या दाम्पत्याला तीन मुली आहेत. या घटनेदरम्यान आरोपीने स्वतः वार करून घेतल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये तो किरकोळ जखमी असून पत्नी गंभीर जखमी आहे. तसेच दोन वर्षीय चिमुकलीचे कान ही चाकूने त्याने कापल्याचे वृत्त आहे.

---

फोटो :

अक्कलकोट-वागदरी रोडवर पतीच्या हल्ल्यातील जखमी पत्नीला जखमी अवस्थेत उचलून जीपमध्ये बसवत असताना

Web Title: On the day of Vatpoornima, an alcoholic husband attacked his wife