धाकटी पंढरी धामणगाव येथे कळसाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:16 IST2021-07-21T04:16:31+5:302021-07-21T04:16:31+5:30
वैराग : बार्शी तालुक्यातील धाकटी पंढरी समजली जाणारे श्री क्षेत्र धामणगाव (ता. बार्शी) येथील विठ्ठलभक्त श्रीसंत माणकोजी बोधले ...

धाकटी पंढरी धामणगाव येथे कळसाचे दर्शन
वैराग : बार्शी तालुक्यातील धाकटी पंढरी समजली जाणारे श्री क्षेत्र धामणगाव
(ता. बार्शी) येथील विठ्ठलभक्त श्रीसंत माणकोजी बोधले महाराज यांची यात्रा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द झाली. यावर्षीही देऊळ बंद ठेवले होते. त्यामुळे अनेक भाविकांनी बाहेरूनच कळसाचे दर्शन घेत समाधान मानले.
संत माणकोजी बोधले महाराज यांच्या विठ्ठलभक्तीमुळे पंढरपूर प्रमाणे क्षेत्र धामणगाव येथे पाच दिवस यात्रा असते. त्यामुळे दरवर्षी येथे पाच दिवस मोठी यात्रा महोत्सव भरत असतो. यंदा कोरोनामुळे त्यांनी दुरूनच कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानले. आषाढी यात्रेच्या निमित्ताने धामणगाव येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी वैद्यकीय अधिकारी प्राजक्ता संगेकर यांनी रग्णवाहिकेसह आवश्यक औषधगोळ्या उपलब्ध करून ठेवल्या होत्या. आरोग्यसेवक वैशाली खराडे नागेश, मोटे, कदम, बाबा स्वामी यांनी येणाऱ्या भक्तांची कोरोना चाचणी केली. कोरोनामुळे याहीवर्षी यात्रा रद्द झाली.