सुस्ते येथे धाडशी चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:16 IST2021-06-10T04:16:20+5:302021-06-10T04:16:20+5:30

त्याच दिवशी मध्यरात्री २.१० वाजण्याच्या सुमारास नीलेश भीमराव भोसले यांच्या दरवाजा बाजूच्या नक्षीतून हात घालून कडी काढून घरात प्रवेश ...

A daring theft attempt at Suste | सुस्ते येथे धाडशी चोरीचा प्रयत्न

सुस्ते येथे धाडशी चोरीचा प्रयत्न

त्याच दिवशी मध्यरात्री २.१० वाजण्याच्या सुमारास नीलेश भीमराव भोसले यांच्या दरवाजा बाजूच्या नक्षीतून हात घालून कडी काढून घरात प्रवेश केला आणि नीलेश भोसले यांच्या गळ्याला चाकू लावून पत्नीच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र व कानातील अर्ध्या तोळ्याची फुले व कपाटाची तोडफोड करून दोन मोबाइल चोरून नेले. चोरटे व नीलेश भोसले यांच्यात झालेल्या झटापटीत नीलेश भोसले यांच्या छातीला चाकू लागला. चोरी करून चोरट्यांनी बाहेरून दरवाजाची कडी लावून निघून गेले.

चोरटे एवढ्यावरच न थांबता, संजय पाटील, कुंदाबाई जालिंदर पवार व बाळू पवार यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. लोक जागे झाल्याचे पाहून चोरट्यांनी पळ काढला. नीलेश भीमराव भोसले यांनी अज्ञात चार व्यक्तींविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. घटनास्थळाची डीवायएसपी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक किरण आवचार, सहायक पोलीस निरीक्षक किरण अवचर, बीट अंमलदार नितीन चौरे, विनायक क्षीरसागर, पोलीस पाटील मनीषा कांबळे यांनी पाहणी केली.

घटनास्थळी श्वानपथक पाचारण केले होते. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अजिनाथ खरात करीत आहेत.

Web Title: A daring theft attempt at Suste