वाळूज परिसरात वादळी वा-याने द्राक्षबागेचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:20 IST2021-03-24T04:20:51+5:302021-03-24T04:20:51+5:30

वाळूज : मोहोळ तालुक्यात वाळूज परिसरातील देगांव, भैरेवाडी, मनगीळी, मुंगशी, साखरेवाडी ...

Damage to vineyards due to strong winds in sandy areas | वाळूज परिसरात वादळी वा-याने द्राक्षबागेचे नुकसान

वाळूज परिसरात वादळी वा-याने द्राक्षबागेचे नुकसान

वाळूज : मोहोळ तालुक्यात वाळूज परिसरातील देगांव, भैरेवाडी, मनगीळी, मुंगशी, साखरेवाडी आणि भागाईवाडी या परिसरात वादळी वाऱ्याने शेती पिंकाचे आणि द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वाळुज येथील शेतकरी दिनकर कादे, सचिन कादे, महेश मोटे, रविंद्र मोटे यांच्या द्राक्षबागेचे लोखंडी फाऊंडेशन वा-याने उन्मळून पडढले. त्यामुळे द्राक्षबागेचे घड जमिनीवर पडलेले. तसेच येथील शेतकरी रमेश कावे यांच्या आंब्याच्या बागेतील कै-या आणि फांद्या तुटल्या आहेत. ज्वारीची रास झाल्याने कडबा खराब झाला. वादळी वाऱ्याने कडबा चोहीकडे उडाला. वादळी वा-यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी येथील शेतकरी दिनकर कादे, सचिन कादे, रविंद्र मोटे यांनी केली आहे.

----

फोटो : २३ वाळूज

Web Title: Damage to vineyards due to strong winds in sandy areas