माढा रोटरीतर्फे दिव्यांगास सायकलभेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:27 IST2021-06-09T04:27:47+5:302021-06-09T04:27:47+5:30

माढा: येथील रोटरी क्लबच्या वतीने एका दिव्यांग बांधवास सायकल प्रदान करण्यात आली. तसेच एका विधवा महिलेस उदरनिर्वाह व ...

Cycle visit to Divyanga by Madha Rotary | माढा रोटरीतर्फे दिव्यांगास सायकलभेट

माढा रोटरीतर्फे दिव्यांगास सायकलभेट

माढा: येथील रोटरी क्लबच्या वतीने एका दिव्यांग बांधवास सायकल प्रदान करण्यात आली. तसेच एका विधवा महिलेस उदरनिर्वाह व मुलाच्या शिक्षणासाठी मदत व्हावी या हेतूने तिला पिठाची चक्की प्रदान करण्यात आली.

रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. अशोक लोंढे यांनी प्रास्ताविक केले. चालू वर्षातील सामाजिक उपक्रमाचा आढावा सचिव किरण चव्हाण यांनी मांडला. यावेळी हरीशजी मोटवानी यांनी माढा रोटरी क्लबने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्‌गार काढले.

माढा रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष पाटील यांनी रोटरी फाउंडेशनला ४१ हजारांची देणगी जाहीर केली.

यावेळी डॉ. सुभाष पाटील, प्रवीण भांगे, औदुंबर पवार, सुधीर माने, रमेश कदम, दिनेश जगदाळे, चार्टर अध्यक्ष डॉ. सोमेश्वर टोंगळे, माजी अध्यक्ष नागनाथ घाडगे, सचिन आप्पा घाडगे, माजी अध्यक्ष भारत लटके, नागेश देशमुख, माजी सचिव प्रशांत उबाळे सहभागी झाले होते.

Web Title: Cycle visit to Divyanga by Madha Rotary