दारूधंद्यांना लगाम... कारवाई अन् समुपदेशनही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST2021-09-10T04:29:06+5:302021-09-10T04:29:06+5:30
राजुरीत घरासमोर दारूविक्री करत असलेल्या गोपीनाथ गोपाळ काळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून आठ हजार ५०० रुपयांची हातभट्टी ...

दारूधंद्यांना लगाम... कारवाई अन् समुपदेशनही
राजुरीत घरासमोर दारूविक्री करत असलेल्या गोपीनाथ गोपाळ काळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून आठ हजार ५०० रुपयांची हातभट्टी दारू व दारू बनवण्यासाठी वापरण्यात येत असलेले रसायन व दारू जप्त करण्यात आली. पारेवाडी येथे गणेश वसंत पवार याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून १७ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. कात्रज येथील महेश शिवाजी रंदवे याच्यावर कारवाई करत दोन हजार ३०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. वीट येथील रामदास मल्हारी खंडागळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून १३ हजार ८०० रुपयांची दारू जप्त केली आहे.
याबरोबर पारेवाडी येथे राहुल गोविंद टोणपे या मटका चालवणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडून ५४० रुपये जप्त केले आहेत. सौंदे येथे बेकायदा किराणा दुकानात गुटखा विकणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्याचे नाव शरद चंद्रकांत गायकवाड असे आहे. त्याच्याकडून तीन हजार ६०० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई अरुण देशपांडे, मारुती रणदिवे, श्रीकांत हरळे, सिद्धेश्वर लोंढे, नितीन चव्हाण, प्रमोद गवळी, जालिंदर गोरे, नितीन ढाकवले यांच्या पथकाने कारवाई केली.