सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार शनिवारी सोलापूर दौऱ्यावर
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: February 1, 2024 19:37 IST2024-02-01T19:36:40+5:302024-02-01T19:37:08+5:30
पावणे दहा वाजेदरम्यान पंढरपूर येथील हेलिपॅडवर त्यांचे आगमन होणार आहे. द

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार शनिवारी सोलापूर दौऱ्यावर
सोलापूर : सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे शनिवारी, ३ फेब्रुवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी ९ वाजता पुणे येथून हेलिकॉप्टरने पंढरपूरकडे रवाना होणार आहेत.
पावणे दहा वाजेदरम्यान पंढरपूर येथील हेलिपॅडवर त्यांचे आगमन होणार आहे. दहा वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्यानंतर, ११ वाजता आर्य वैश्य महासभेच्या तिसऱ्या अधिवेशन कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. दुपारी सव्वा चार वाजता हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होणार आहेत.