शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांना गाळप परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 14:40 IST

सोलापूर : राज्यातील १०५ साखर कारखान्यांना शुक्रवारपर्यंत साखर आयुक्तांनी गाळप परवाने दिले असून, यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १७ कारखान्यांचा समावेश ...

ठळक मुद्देराज्यातील १०५ साखर कारखान्यांना गाळप परवाने दिलेसोलापूर जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा समावेश एफआरपी न दिलेल्या अनेक कारखान्यांनी गाळप सुरू केले

सोलापूर: राज्यातील १०५ साखर कारखान्यांना शुक्रवारपर्यंत साखर आयुक्तांनी गाळप परवाने दिले असून, यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १७ कारखान्यांचा समावेश आहे. दरम्यान, मागील वर्षीची एफआरपीची रक्कम अद्याप न दिलेल्या अनेक साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे.

मागील वर्षीच्या उसापोटीची एफआरपीची रक्कम न देणाºया साखर कारखान्यांना यावर्षी गाळप परवाना देऊ नये व उशिरा पैसे देणाºया कारखान्यांनी व्याज द्यावे, यासाठी गोरख घाडगे व अन्य शेतकºयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे साखर आयुक्तांनीही एफआरपी थकविणाºयांना गाळप परवाना न देण्याची भूमिका घेतली आहे. असे असले तरी न्यायालयात याचिका सुरू असताना व शेतकºयांचे पैसे दिले नसतानाही अनेक साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. साखर आयुक्त कार्यालयाने शुक्रवारपर्यंत राज्यातील १०५ साखर कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा समावेश आहे. असे असले तरी परवाना नसलेले व एफआरपी न दिलेल्या अनेक कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. 

या कारखान्यांना मिळाला परवानासोलापूर जिल्ह्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे, श्री पांडुरंग कारखाना श्रीपूर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, जकराया वटवटे, गोकुळ माऊली, भैरवनाथ आलेगाव, भैरवनाथ विहाळ, भैरवनाथ लवंगी, लोकमंगल अ‍ॅग्रो बीबीदारफळ, लोकमंगल शुगर भंडारकवठे, युटोपियन, श्री. विठ्ठल गुरसाळे, लोकनेते बाबुरावअण्णा पाटील अनगर, सीताराम महाराज खर्डी, विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव, फॅबटेक शुगर, इंद्रेश्वर खामगाव, बार्शी आदी कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. 

पारदर्शकतेचा केवळ देखावाच: देशमुखअनेक साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार व मागील वर्षी ठरल्याप्रमाणे शेतकºयांना पैसे दिले नाहीत. इकडे अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे शेतकºयांना पैसे दिले नाहीत, मात्र कारखाने सुरू केले आहेत. संपूर्ण रक्कम शेतकºयांना मिळाली का?, हे तपासणीसाठी शासनाकडे यंत्रणाच नाही. याशिवाय वजनकाटे तपासणीसाठी कारखानदारांना अगोदर सूचना देऊन तपासणी केली जाते. यामुळे पारदर्शकतेचा केवळ देखावाच असल्याचा आरोप जनहित शेतकरी संघटनेचे भैय्या देशमुख यांनी केला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSugar factoryसाखर कारखाने