शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

Crime News: वन्यप्राण्याची शिकार करणाऱ्या दोन जणांना सोलापूरच्या वनविभागाने घेतले ताब्यात

By appasaheb.patil | Updated: February 13, 2023 13:54 IST

Crime News: तरस या वन्य प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीनंतर वनविभागाने या प्रकरणातील आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना आज सोमवारी मंगळवेढा येथील न्यायालयात उभे केले जाणार आहे.

- आप्पासाहेब पाटील

सोलापूर - तरस या वन्य प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीनंतर वनविभागाने या प्रकरणातील आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना आज सोमवारी मंगळवेढा येथील न्यायालयात उभे केले जाणार आहे.

दरम्यान, ८ फेब्रुवारी रोजी पंढरपूर वनपरिक्षेत्रांतर्गत मंगळवेढा तालुक्यातील मारोळी येथे तरस या वन्य प्राण्याला जखमी करून अवैधरीत्या शिकार करण्यात आली. या प्रकरणी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, वनसंरक्षक बी.जी. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने श्रीशैल शंकर जमखंडे (वय ३०, रा.मारोळे, ता.मंगळवेढा) या संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला. मंगळवेढा न्यायालयापुढे करून १३ फेब्रुवारीपर्यंत वन कोठडी मिळविली होती. त्यानंतर तपास कार्यात आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे.

दोन दिवसांच्या काळात झालेल्या तपासात आणखी दोघांची नावे या प्रकरणी निष्पन्न झाली. त्यानुसार, चंद्रकांत गुरप्पा हिंचगिरे (वय २९), मलकारी चंद्रकांत हिंचगिरे (४३) (दोघे रा.जठर बबलाद, ता.जत) यांना ताब्यात घेण्यात आले. वरील सर्व आरोपींना आज सोमवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. तिघांविरुद्ध अवैध शिकार केल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलमांन्वये वनगुन्हा नोंदला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहा.वनसंरक्षक बी.जी. हाके, वनपरिक्षेत्र अधिकारी सी.एस. वाघ करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर