शेतकऱ्याला फसवल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:22 IST2021-01-25T04:22:10+5:302021-01-25T04:22:10+5:30
बार्शी : येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्याशी संगनमत करून श्रीहरी श्रीपती शिंदे या शेतकऱ्याच्या नावावर परस्पर ...

शेतकऱ्याला फसवल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
बार्शी : येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्याशी संगनमत करून श्रीहरी श्रीपती शिंदे या शेतकऱ्याच्या नावावर परस्पर कागदपत्रे तयार करून बनावट सह्या करून तीन लाख रुपये कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने आदेश देताच बार्शी शहर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शेतकरी श्रीहरी श्रीपती शिंदे (वय ४८, रा. बाभूळगाव, ता. बार्शी) यांनी पोलिसात तक्रार दिली होती. मात्र त्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर बँक ऑफ इंडिया शाखा, ढगे मळा शाखेचे अधिकारी, बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज (तुर्कपिंपरी, ता. बार्शी) चेअरमन रणजितसिंह बबनराव शिंदे व एक अनोळखी व्यक्ती या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शामराव गव्हाणे करत आहेत.
-----