निवृत्त बँक मॅनेजरच्या मृत्यूप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:21 IST2021-05-22T04:21:32+5:302021-05-22T04:21:32+5:30

कुर्डूवाडी : एका दुचाकीच्या धडकेत बँक ऑफ बडोदाचे सेवानिवृत्त मॅनेजर आनंद शिवमूर्ती रजपूत (६६) यांचा मृत्यू झाला होता. बाळासाहेब ...

Crime against teacher in case of death of retired bank manager | निवृत्त बँक मॅनेजरच्या मृत्यूप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा

निवृत्त बँक मॅनेजरच्या मृत्यूप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा

कुर्डूवाडी : एका दुचाकीच्या धडकेत बँक ऑफ बडोदाचे सेवानिवृत्त मॅनेजर आनंद शिवमूर्ती रजपूत (६६) यांचा मृत्यू झाला होता. बाळासाहेब तुळशीराम खुणे (रा. कुर्डूवाडी, ता. माढा) या शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

८ मे रोजी सायंकाळी ६.५० च्या दरम्यान हा अपघात झाला होता. याप्रकरणी आशिष आनंद रजपूत (रा. भोसरे, कुर्डूवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

अपघातादरम्यान ८ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आनंद रजपूत हे कुर्डूवाडी-अकुलगाव रस्त्यावरून एमआयडीसीकडे चालत व्यायाम करीत निघाले होते. व्यायाम करून व फिरून घराकडे परतत असताना अकुलगावकडून कुर्डूवाडीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. यात रजपूत हे रस्त्यावर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. अपघातानंतर नातेवाईकांनी त्यांना पुढील उपचारासाठी बार्शी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पण रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात बाळासाहेब तुळशीराम खुणे या शिक्षकाकडून झाल्याचे तपासात उघड झाले आणि पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला.

Web Title: Crime against teacher in case of death of retired bank manager