मंगळवेढ्यात मटका घेतल्याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:47 IST2021-02-05T06:47:17+5:302021-02-05T06:47:17+5:30
पोलीस सूत्रांनुसार, सोमवारी दीडच्या सुमारास मंगळवेढा शहरात शिवाजी चौकातील लिंबाच्या झाडाच्या आडोशाला यातील आरोपी हारूण इनामदार हा येणाऱ्या- जाणाऱ्या ...

मंगळवेढ्यात मटका घेतल्याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा
पोलीस सूत्रांनुसार, सोमवारी दीडच्या सुमारास मंगळवेढा शहरात शिवाजी चौकातील लिंबाच्या झाडाच्या आडोशाला यातील आरोपी हारूण इनामदार हा येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांकडून अंदाजे आकड्यावर पैशाची पैज लावून कल्याण मटका घेत असताना पोलिसांना मिळून आला. तर सदरचा मटका आरोपी कैलास कोळी यास मदत करीत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे दोघांविरुद्ध जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदवून ११ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पंढरपूर उपविभागीय कार्यालयातील पोलीस शिवशंकर सोमण्णा हुलजंती यांनी दिली फिर्याद दिली आहे.
-----
चिठ्ठी गेली आता व्हाटस्ॲपवरद्वारे मटका
पूर्वी चिठ्ठीद्वारे खेळणारा मटका आता व्हाटसअॅपच्या माध्यमातून खेळला जात असल्याचे चित्र दिसत आहे. मटक्यामध्येही आधुनिक तंत्राचा वापर करून पोलीस यंत्रणेला हुलकावणी दिली जात आहे. परंतु, रस्त्याच्या कडेला व पानटपऱ्यांवरून तीन एजंटामार्फत मटका सुरू असल्याचे दिसत आहे.
----