शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पालखी विसाव्याच्या ठिकाणी फिरणाºया ३० संशयितांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 14:06 IST

सोलापूर ग्रामीण पोलीसांची कारवाई;  दोघांनी दिली गुन्ह्याची कबुली, शिंगणापूर पाटी, येळीव-माळशिरस, अकलूज येथून घेतले ताब्यात

ठळक मुद्देपोलीस निरीक्षक अरुण सावंत यांनी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत पालखी विसाव्याच्या ठिकाणी पेट्रोलिंग केलेपेट्रोलिंग दरम्यान ३० संशयित आरोपी मिळून आले, संशयितांना ताब्यात घेऊन त्यातील २७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली

सोलापूर : पंढरपूर येथील आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी विसाव्याच्या ठिकाणी संशयितरित्या फिरणाºया ३0 जणांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

वारी शांततेत व सुरळीतपणे पार पडावी तसेच चोरीसारख्या घटना घडू नयेत यासाठी  पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांनी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत पालखी विसाव्याच्या ठिकाणी पेट्रोलिंग केले. पेट्रोलिंग दरम्यान ३० संशयित आरोपी मिळून आले. संशयितांना ताब्यात घेऊन त्यातील २७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. ३ जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली. दरम्यान, पंढरपूर शहर व तालुक्याच्या ठिकाणी चोरून अवैध दारूचा व्यवसाय करणाºया दोन इसमांविरुद्ध कारवाई करून १० लिटर हातभट्टी व १६ दारूच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

दोघांनी दिली गुन्ह्याची कबुली...- संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी विसाव्याच्या ठिकाणी अमोल नाना काळे (रा. आरोळेवस्ती, जामखेड, जि. अहमदनगर) याची चौकशी केली असता, त्याच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाणे जि. अहमदनगर व येरमाळा जि. उस्मानाबाद येथे चोरी, घरफोडीचे गुन्हे आहेत.  अक्षय लखन पवार (रा. मिलिंदनगर, जामखेड, जि. अहमदनगर) व अमोल काळे या दोघांनी नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. 

पंढरपूर शहर व तालुक्याच्या ठिकाणी पेट्रोलिंग करून मालाविषयक गुन्हे करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या फिरणाºया इसमाचा शोध घेऊन, प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. तीन स्वतंत्र पथक गठीत करण्यात आले असून, दररोज पेट्रोलिंग केले जात आहे. -अरुण सावंत, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा (ग्रामीण)

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा