तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थडे बॉयसह ११ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:23 IST2021-02-16T04:23:52+5:302021-02-16T04:23:52+5:30

पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पासो पवार हे १५ रोजी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असताना सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा फोटो व्हायरल ...

Crime against 11 people, including a birthday boy, for cutting a cake with a sword | तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थडे बॉयसह ११ जणांवर गुन्हा

तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थडे बॉयसह ११ जणांवर गुन्हा

पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पासो पवार हे १५ रोजी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असताना सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा फोटो व्हायरल झाल्याचे कळले. त्यानंतर त्यांनी याची खातरजमा केली. १४ 4 रोजी रात्री ७३० च्या सुमारास महुद- पंढरपूर रोडवरील गायगव्हाण येथील एका हॉटेलच्या बाहेरील बाजूस नागज ता. कवठेमंकाळ येथील अफसर बालीखान शेख याचा हलदहिवडी ता.सांगोला येथील मुबारक हिरालाल शेख, रफीक पैगंबर शेख, अब्बास कमाल शेख, दिलावर बाबासो शेख, अनिस कमाल शेख, चांद राजू शेख, अजित मकबूल शेख, फिरोज पैगंबर शेख, शिवाजी मछिंद्र लेंडवे व विक्रम सदाशिव गायकवाड यांनी जिल्हाधिका-यांच्या ५ पेक्षा जास्त लोक एकत्रित जमवून जमावबंदीचा आदेश डावलून तलवारीने केक कापून मित्राचा वाढदिवस साजरा केला.

दरम्यान अफसर शेख याच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. या घटनेची पोलीस हेड काँन्सटेबल आप्पासो पवार यांनी दखल घेवून बर्थडे बॉयसह ११ जणांवर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस नाईक संदीप पर्वते करीत आहे.

Web Title: Crime against 11 people, including a birthday boy, for cutting a cake with a sword