शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

माकपकडून सहा प्रभागांसाठी ५० जणांची यादी तयार

By admin | Updated: January 24, 2017 19:29 IST

माकपकडून सहा प्रभागांसाठी ५० जणांची यादी तयार

माकपकडून सहा प्रभागांसाठी ५० जणांची यादी तयारविलास जळकोटकर - सोलापूरमहापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच सर्वच पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. माकप कार्यालयातही उमेदवारांची रेलचेल सुरु झाली असून, गेल्या सहा महिन्यांपासून पक्षाच्या वतीने ज्या प्रभागात प्राबल्य आहे तेथे चाचपणी करुन ५० जणांची यादी तयार करण्यात आली आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्षांना शह देण्यासाठी आघाडीची प्रक्रिया सुरु झाली असून, याला सकारात्मक यश आल्यास माकप जागा सोडण्यास तयार असल्याचे संकेत पक्षाचे जिल्हा सचिव एम. एच. शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.माकपमधून अन्य पक्षांप्रमाणे इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून घेण्याची प्रक्रिया नसते. पक्षाच्या वतीने गेल्या सहा महिन्यांपासून ज्या प्रभागात पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या सक्रिय लोकांची यादी तयार करण्यात येते. त्याप्रमाणे पक्षाने अशा ५० जणांची यादी तयार केली आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी ९, १३, १४, १६, १७, १८ या प्रभागांची निवड करण्यात आली आहे. या सहा प्रभागातून ५० जणांच्या यादीतून २४ जणांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे. यासाठी सर्व प्रभागांमध्ये बैठका घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात लढायचे असेल तर आघाडी होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने युतीसाठी चर्चा, बैठका सुरु झाल्या आहेत. या आघाडीमध्ये प्रामुख्याने समाजवादी पार्टी, जनता दल, भारिप बहुजन महासंघ, लेबर पार्टी, आम आदमी, अन्य समविचारी पक्ष आणि माकपचा समावेश असणार आहे-----------------जनतेला पर्याय हवाय४शहरातील जनता काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-सेनेला कंटाळली आहे. त्यांना पर्याय हवा आहे. मूलभूत समस्या सोडवल्या जाव्यात, किमान विकास व्हावा, या बाबींच्या पूर्ततेसाठी तिसरी आघाडी तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जबाबदार आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली दीड लाख लोकांसाठी देखावा केला जात असून, हद्दवाढमधील लोकांकडे दुर्लक्ष होत असून, जनतेला सक्षम पर्याय देण्यासाठी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरेल, अशी अपेक्षा भाकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आडम मास्तर यांनी स्पष्ट केले.----------------सोलापूर महापालिकेत निवडणुकीनंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आघाडीचा एक दबाव गट असेल. त्या प्रमाणात उमेदवार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल.- अ‍ॅड. एम. एच. शेख, माकप, जिल्हा सचिव