बांधावरील गिनीगोल गवत काढल्याने चुलत्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:23 IST2021-05-08T04:23:12+5:302021-05-08T04:23:12+5:30

कुर्डूवाडी : शेतातील बांधावरील गिनीगोल गवत कापल्याचा जाब विचारल्याने एका महिलेसह तिचा पती व मुलाला शेजारील चौघांनी मारहाण केली. ...

The cousin was beaten for removing the guinea pig grass on the dam | बांधावरील गिनीगोल गवत काढल्याने चुलत्याला मारहाण

बांधावरील गिनीगोल गवत काढल्याने चुलत्याला मारहाण

कुर्डूवाडी : शेतातील बांधावरील गिनीगोल गवत कापल्याचा जाब विचारल्याने एका महिलेसह तिचा पती व मुलाला शेजारील चौघांनी मारहाण केली.

माढा तालुक्यात कव्हे येथे गुरुवारी सकाळी ७:३० वाजता ही घडली. याबाबत तानाजी सोपान काळे (रा. कव्हे) यांनी फिर्याद दिली असून कुर्डूवाडी पोलिसांनी सचिन काळे, संदीप काळे, बाबूराव सोपान काळे, उशाबाई काळे (सर्व रा.कव्हे, ता. माढा) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडील माहितीनुसार तानाजी काळे यांची कव्हे येथे शेतजमीन आहे. त्यांच्या शेजारीच त्यांचा सख्खा भाऊ बाबूराव सोपान काळे यांचीही शेतजमीन व घर आहे. गुरुवारी सकाळी ७:३० वाजता काळे यांच्या पत्नीने बांधावरील गिनीगोल गवत का कापले म्हणून पुतण्या सचिन काळे याला जाब विचारला. त्यावर सचिन याने मी गवत कापीन नाही तर काहीही करेन, म्हणत शिवीगाळ केली. पतीला शिवीगाळ करू नकोस म्हणताच पुतण्याने हातातील काठीने फिर्यादीस मारहाण केली. यावेळी मुलगा बंडू यालाही त्याने बाहेर ये, म्हणून हाक मारली आणि मारहाण केली. यावेळी त्याच्यासोबत संदीप काळे, बाबूराव काळे, उषाबाई काळे यांनी मारहाण केली.

Web Title: The cousin was beaten for removing the guinea pig grass on the dam