जमिनीच्या वादातून चुलत जावेचा चावा घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:22 IST2021-05-23T04:22:18+5:302021-05-23T04:22:18+5:30

जवळा येथील नितीन साळुंखे व चुलत चुलते आप्पासाहेब साळुंखे यांच्यामध्ये १९९७ पासून जमिनीचा वाद असल्याने कोर्टात केस चालू आहे. ...

The cousin took a bite out of the land dispute | जमिनीच्या वादातून चुलत जावेचा चावा घेतला

जमिनीच्या वादातून चुलत जावेचा चावा घेतला

जवळा येथील नितीन साळुंखे व चुलत चुलते आप्पासाहेब साळुंखे यांच्यामध्ये १९९७ पासून जमिनीचा वाद असल्याने कोर्टात केस चालू आहे. त्यामुळे चुलत सासरे व त्यांच्या घरातील इतर लोक त्यांना जमीन वहिवाटीस नेहमी अडथळा करीत होते. याबाबत पोलिसात एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल आहेत. २१ रोजी सुवर्णा साळुंखे, नितीन साळुंखे व विनायक साळुंखे असे चुलत सासरे आप्पासाहेब साळुंखे यांच्या घरी जमिनीचा वाद मिटविण्यासाठी गेले होते; परंतु त्यांनी या चर्चेला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सर्वजण परत घराकडे जात असताना चुलत जाऊ लता संजय साळुंखे हिने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून विनायक साळुंखे यास मारण्यासाठी कुऱ्हाड घेऊन अंगावर धावून आली. यावेळी सुवर्णाने तिला रोखले तर नितीन साळुंखे यांनी कुऱ्हाड काढून घेतली; परंतु तिने सुवर्णाला हाताच्या कोपऱ्याला चावा घेऊन जखमी केले. याबाबत सुवर्णा साळुंखे हिने लता साळुंखे हिच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: The cousin took a bite out of the land dispute