चुलत दाजीची मेव्हण्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:22 IST2021-01-03T04:22:39+5:302021-01-03T04:22:39+5:30

डोंगरगाव येथील विक्रम प्रकाश कोडग यांचे चुलत दाजी प्रवीण केशव शिंदे (रा. वाळेखिंडी, ता. जत) ...

Cousin Daji beats Mevhanya | चुलत दाजीची मेव्हण्यास मारहाण

चुलत दाजीची मेव्हण्यास मारहाण

डोंगरगाव येथील विक्रम प्रकाश कोडग यांचे चुलत दाजी प्रवीण केशव शिंदे (रा. वाळेखिंडी, ता. जत) यांनी दारूच्या नसेत विक्रमला शिवीगाळ, दमदाटी केली होती. ३१ डिसेंबर रोजी दु. ४ च्या सुमारास विक्रमच्या घरासमोर चुलत दाजी प्रवीण शिंदे हा दारूच्या नशेत येऊन विक्रम कोडग याला विनाकारण शिवीगाळ करू लागला. तुम्ही मला विनाकारण शिव्या का देता, असे विचारले असता त्याने तुझे कोण असेल ते घेऊन ये, मी तुला सोडणार नाही, अशी धमकी देत मी एकटाच आहे, असे बोलून पाठीमागे लपवलेला लोखंडी रॉड काढीत विक्रमच्या छातीत, हातावर, पाठीवर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी विक्रम प्रकाश कोडग यांनी प्रवीण केशव शिंदे याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Cousin Daji beats Mevhanya