शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या थकबाकीसाठी सोलापूर जिल्हा बँकेची न्यायालयीन लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 13:12 IST

वसुलीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पुढाकार : आर्यन शुगरचा ताबा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अपील

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या कर्जाची थकबाकी वाढल्याने बँक सध्या अडचणीतविजय शुगरकडे जिल्हा बँकेची १७९ कोटी १४ लाख ७० हजार रुपये थकबाकी

सोलापूर: विजय शुगरचा ताबा घेतल्यानंतर आता आर्यन शुगरचा ताबा मिळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. मोठ्या थकबाकीदारांच्या वसुलीसाठी बँकेची सध्या न्यायालयीन व प्रशासकीय लढाई सुरू आहे. 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या कर्जाची थकबाकी वाढल्याने बँक सध्या अडचणीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमुळे बँकेच्या शेतकºयांकडील वसुलीसाठी हातभार लागला आहे; मात्र मोठ्या थकबाकीदारांकडील वसुली होत नसल्याने बँकेने मालमत्ता ताब्यात घेणे व त्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील विजय शुगरकडे जिल्हा बँकेची सुमारे १७९ कोटी १४ लाख ७० हजार रुपये इतकी थकबाकी आहे. ही रक्कम वसूल होत नसल्याने बँकेने रितसर विजय शुगरच्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. आता बँक या कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच बार्शी तालुक्यातील खामगाव येथील आर्यन शुगरचा ताबा मिळावा यासाठी बँकेने उच्च न्यायालयात अपील केले आहे. आर्यन शुगरकडे जिल्हा बँकेचे २१९ कोटी ४१ लाख २९ हजार रुपये थकीत आहेत. ही रक्कम वसूल करण्यासाठीची प्रक्रिया कारखान्याची मालमत्ता विक्री करुनच पूर्ण होणार आहे.आदित्यराज शुगरवर ४५ कोटींचा बोजामाजी संचालक अरुण कापसे यांच्या आदित्यराज शुगरकडे २५ कोटी ८९ लाख ७२ हजार रुपये मुद्दल व १९ कोटी २८ लाख ४३ हजार रुपये व्याज असे ४५ कोटी १८ लाख १५ हजार रुपये थकबाकी आहे,  कर्जापोटीच जुळे सोलापुरातील गट नंबर ९/१ब, प्लॉट नंबर १२ क्षेत्र ३०४ चौरस मीटरचा ताबा घेतला आहे. चार कारखान्यांकडे ५६६ कोटी थकले !

  • - आर्यन शुगरकडे मुद्दल १३१ कोटी ५ लाख ९ हजार व व्याज ८८ कोटी ३६ हजार २०६ रुपये अशी २१९ कोटी ४१ लाख २९ हजार थकबाकी आहे.
  • - विजय शुगरकडे ११३ कोटी ६० लाख ७५ हजार तर व्याज ६५ कोटी ५४ लाख रुपये असे १७९ कोटी १४ लाख ७० हजार रुपये येणेबाकी आहे. 
  • - अक्कलकोटच्या स्वामी समर्थ साखर कारखान्याकडे ५८ कोटी ४६ लाख ७४ हजार रुपये मुद्दल व २९ कोटी २९ लाख ३० हजार रुपये व्याज अशी ८७ कोटी ७६ लाख ४ हजार रुपये इतकी थकबाकी आहे.
  • - सांगोला साखर कारखान्याकडे ३७ कोटी १२ लाख ९३ हजार रुपये मुद्दल व ४२ कोटी ९६ लाख ४० हजार रुपये व्याज अशी एकूण ८० कोटी ९ लाख ३३ हजार रुपये थकबाकी आहे. 
  • - विजय, आर्यन, स्वामी समर्थ व सांगोला या चार कारखान्यांकडे ५६६ कोटी ४१ लाख ३६ हजार रुपये थकले आहेत. 

शेतकºयांना पीक असेल त्याप्रमाणे कर्ज देण्यासाठी बँकेला पैशाची गरज आहे. मोठ्या सर्वच थकबाकीदारांकडील वसुलीसाठी बँकेचा प्रयत्न आहे. वसुली आल्यानंतर शेतकºयांनाच प्राधान्याने कर्ज दिले जाणार आहे.- राजन पाटीलअध्यक्ष, जिल्हा बँक

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक