शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

दोन घराण्यांनी जोडलं ‘किडनीचं नातं’, दोन कुटुंबांमध्ये अवयवांची अदलाबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 10:54 IST

‘अश्विनी’त १४ तास शस्त्रक्रिया; दोन कुटुंबांमध्ये अवयवांची अदलाबदल

ठळक मुद्देअवयवदानाच्या कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालयात एकाच वेळी किडनी दानातून दोन जीव तर वाचलेच पण दोन कुटुंबांना आधार मिळालापहिले स्वॅप किडनी प्रत्यारोपण

नारायण चव्हाण सोलापूर : परस्परांचे नातलग नसतानाही गरजेतून दोन कुटुंबे एकमेकांशी जोडली गेली . किडनी दानातून दोन जीव तर वाचलेच पण दोन कुटुंबांना आधार मिळाला. अवयवदानाच्या कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालयात एकाच वेळी पार पडलेल्या चार शस्त्रक्रियांनी ही किमया घडली.

एका कुटुंबातील कर्ता मुलगा किडनीच्या आजाराने त्रस्त होता. साडेतीन वर्षांपासून तो डायलिसिसवर होता. डॉक्टरांनी किडनी बदलण्याचा सल्ला दिला. त्याची आई किडनी देण्यासाठी पुढे सरसावली, परंतु मुलाचा रक्तगट बी पॉझिटिव्ह तर आईचा ए पॉझिटिव्ह असल्याने तो जुळत नव्हता . मूत्ररोगतज्ज्ञ डॉ़ संदीप होळकर या रुग्णावर उपचार करीत होते . काही दिवसांनी अन्य राज्यातील एक जोडपे डॉ़ संदीप होळकर यांना भेटले . त्यातील कुटुंबकर्त्याला किडनीच्या आजाराने ग्रासले होते . पत्नी स्वत:ची किडनी देण्यास तयार होती, मात्र तिचा रक्तगट बी पॉझिटिव्ह होता अन् पतीचा ए पॉझिटिव्ह . रक्तगट जुळत नसल्याने दोन्ही कुटुंबे विवंचनेत होती . डॉ . होळकरांनी ही समस्या हेरून त्यांचे समुपदेशन केले. तब्बल चार महिने त्यासाठी वेळ दिला आणि विजोड असलेली रक्ताची नाती अखेर जुळली .

विशेष म्हणजे ही दोन्ही कुटुंबे दोन वेगवेगळ्या राज्यातून आलेली . परस्परांचा परिचय नाही तरी समस्या दोन्ही कुटुंबांची सारखीच . दोन महिलांनी दाखवलेल्या किडनी दानातून दोन्ही कुटुंबे सावरली . त्यांना आधार मिळाला . एकाच कुटुंबातील दोघांचे रक्तगट जुळले नाहीत, तरीही गरज आणि दोन महिलांच्या त्यागातून अनोळखी , भिन्न भाषी कुटुंबे त्याच रक्ताच्या नात्यांनी कायमची जोडली गेली . किडनी प्रत्यारोपण समन्वयक सागर देसाई यांची यात महत्वाची भूमिका राहिली .डॉ हेमंत देशपांडे , डॉ़ विठ्ठल कृष्णा , डॉ़ मयूर मस्तूद , डॉ़ रामचंद्र लहांडे , डॉ़ वैशाली येमूल , डॉ़ शोएब खान , डॉ़ सना मंगलगिरी , डॉ़ देडिया , डॉ़ आरती मडनोळे , डॉ़ गुणवंत नस्के , डॉ़ सिद्धेश्वर करजखेडे यांनी परिश्रम घेतले . अश्विनी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ़ माधवी रायते , संस्थेचे अध्यक्ष बिपीनभाई पटेल , भारतीबेन पटेल , मेहुल पटेल , उपअधिष्ठाता डॉ़ सचिन मुंबरे यांचेही मार्गदर्शन मोलाचे ठरले .

पहिले स्वॅप किडनी प्रत्यारोपणकुंभारीतील अश्विनी ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत किडनी प्रत्यारोपणाच्या लाईव्ह आणि कॅडव्हेरिक शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत . मात्र एकाच वेळी परस्परांना किडनीदान केल्यानंतर तिचे प्रत्यारोपण करणारे स्वॅप प्रत्यारोपण पहिलेच आहे किंबहुना सोलापुरातील ही पहिलीच घटना आहे.

चार शस्त्रक्रिया, १४ तासस्वॅप किडनी प्रत्यारोपण प्रक्रियेत किडनीदाता आणि तिचा लाभार्थी असे चार जण होते . एकाच वेळी या चारही जणांवर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या . सकाळी ६ वाजता सुरू झालेल्या या चारही शस्त्रक्रिया सायंकाळी ८ वाजेपर्यंत चालल्या . तब्बल १४ तासांच्या अविश्रांत परिश्रमानंतर त्या यशस्वी झाल्या . डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला .

टॅग्स :SolapurसोलापूरOrgan donationअवयव दानHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल