निटवेवाडी घाटात दांपत्यास लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:22 IST2021-09-03T04:22:55+5:302021-09-03T04:22:55+5:30
दिवसा उजेडी मारण्याची भिती घालुन दागीने हिसकावले माळशिरस : नातेपुतेजवळ कमी रहदारी असणाऱ्या निटवेवाडी घाटात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ...

निटवेवाडी घाटात दांपत्यास लुटले
दिवसा उजेडी मारण्याची भिती घालुन दागीने हिसकावले
माळशिरस : नातेपुतेजवळ कमी रहदारी असणाऱ्या निटवेवाडी घाटात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मारहाण करण्याची भीती घालून अनोळखी तीन इसमांनी मोटारसायकलवरील दापत्यास अडवून १ लाख ५ हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत नातेपुते पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून स.पो.नि. मनोज सोलवनकर अधिक तपास करीत आहेत.
महादेव दादा जानकर व त्यांची पत्नी सविता जानकर (रा. जानकर वस्ती-नातेपुते, ता. माळशिरस) हे दांपत्य भालवडी (ता. माण) येथून लग्नाचा कार्यक्रम आटोपून मोटारसायकलवरून भाळवणी, खुटभाव, निटवेवाडी, फडतरी मार्गे परत नातेपुतेकडे येण्यासाठी निघाले असता सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास खुटभावी ते निटवेवाडी या घाटातील रोडवरील दुसऱ्या वळणाच्या उतारावर बिगर नंबर मोटारसायकल आडवी लावून नेकलेस, बोरमाळ, लक्ष्मीहार, गंठण असे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे दागिने अनोळखी तीन चोरट्यांनी मारहाण करण्याची भीती दाखवून बळजबरीने काढून घेतले. याबाबत नातेपुते पोलिसात तक्रार दिली आहे.