शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

नवरा-बायकोच्या नात्यातील प्रेम द्विगुणित करणारा ‘कपल चॅलेंज’ सोशल मिडियावर फेमस

By appasaheb.patil | Updated: September 23, 2020 14:52 IST

सोशल मिडियावर नवा ट्रेंड; नेटिझन्सकडून चांगला प्रतिसाद...

ठळक मुद्देकपल चॅलेंजच्या माध्यमातून आपल्या प्रिय व्यक्ती किंवा पत्नीसोबत काढलेला सुंदर फोटो प्रत्येक जण फेसबुकवर शेअर करीत आहेएखाद्या व्यक्तीने सोशल मीडियावर दुसºयांना चॅलेंज दिलं तर ते व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाहीचॅलेंजच्या माध्यमातून नवरा-बायकोमधील प्रेम अधिक अतूट

सुजल पाटील

सोलापूर : गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेंडचा सपाटा सुरु आहे़ नवरा-बायकोच्या नात्यात गोडवा निर्माण करणारा, दोघांमधील प्रेम द्विगुणित करणारा ट्रेंड सोशल मीडियावर गाजत आहे़.

सोशल मीडियावर यापूर्वी एकमेकांना अनेक चॅलेंज देण्याचे ट्रेंड झाले़ मात्र सध्या कोरोनाच्या लॉकडाऊननंतर अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ आता लॉकडाऊननंतर नव्याने आयुष्य जगणाºया नेटिझन्सने ‘चॅलेंज कपल’ ही अनोखी स्पर्धा सुरू केली़ या स्पर्धेत सोशल मीडियावरील मित्र आपल्या प्रिय व्यक्तीचा किंवा पत्नीसोबत काढलेला फोटो फेसबुकवर शेअर करून आपल्या जवळच्या दहा ते पंधरा मित्रांना चॅलेंज करतात़ त्यानुसार त्या नेटिझन्सचे मित्र ते चॅलेंज स्वीकारून स्वत:च्या पत्नीसोबत काढलेला सुंदर फोटो शेअर करून पुन्हा चॅलेंज करतात़ अशाप्रकारे एकमेकांना चॅलेंज करून आपल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करण्याची सोशल मीडियावर स्पर्धा लागली आहे.

दरम्यान, अल्पावधीतच हा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे़ फेसबुकवर स्क्रोल केलं तर सगळीकडे ‘चॅलेंज कपल’ हेच दिसून येत आहे़ या स्पर्धेत नवविवाहित युवक, युवतींसह ज्येष्ठांचाही समावेश आहे़ काहींनी आपल्या परिवारासोबतचा फोटो शेअर करून चॅलेंज केले आहे़ हा ट्रेंड कसा सुरू झाला, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता लागून राहिली आहे.-------------नवरा-बायकोमधील प्रेम होतंय अतूट...एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियावर दुसºयांना चॅलेंज दिलं तर ते व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाही. कपल चॅलेंजबाबतही तसंच झालं आहे. कोणताही विचार न करता अनेक जण हे चॅलेंज स्वीकारत आहेत. या चॅलेंजमध्ये चॅलेंज स्वीकारणारे मित्र आपल्या प्रिय व्यक्ती किंवा पत्नीसोबतचा एक फोटो फेसबुकवर शेअर करून एकमेकांना चॅलेंज करीत आहेत़ या चॅलेंजच्या माध्यमातून नवरा-बायकोमधील प्रेम अधिक अतूट होत असल्याचे नेटिझन्स व वीरशैव व्हिजनचे राजशेखर बुरकुले यांनी सांगितले़ --------------विवाह न झालेले नेटिझन्स नाराज़...कपल चॅलेंजच्या माध्यमातून आपल्या प्रिय व्यक्ती किंवा पत्नीसोबत काढलेला सुंदर फोटो प्रत्येक जण फेसबुकवर शेअर करीत आहे़ त्यामुळे ज्या नेटिझन्सचे वय झाले आहे मात्र लग्न झाले नाही अशांनी या चॅलेंजवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. एकाने फेसबुकवर ‘ते कपल चॅलेंजसारखं सिंगल चॅलेंज पण ठेवता येतंय का? बघाकी, जरा.. अखिल भारतीय सिंगल संघटना’ अशी पोस्ट टाकून या चॅलेंजबद्दल नाराजी व्यक्त केली आहे़ ---------- 

टॅग्स :SolapurसोलापूरSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलFacebookफेसबुकLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट