शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

देशाच्या रक्षणकर्त्यांना सोलापूरातून एक लाख राख्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 3:53 PM

रक्षा बंधन : जुळे सोलापूर बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम 

ठळक मुद्देजुळे सोलापूर बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम विद्यार्थिनींनी स्वत:च्या हाताने घरात राख्या तयार केल्यासीमेवरील १ लाख जवानांपर्यंत पोहचणार

सोलापूर :        आओ झुककर करे सलाम उन्हे।जिनके हिस्से मे ये मुकाम आता है कितने खुश नसीब है वह लोग।। जिनका खुन वतन के काम आता है ।। असा संदेश देत ख्वाजा बंदे नवाज उर्दू हायस्कूलमधील विद्यार्थिनींनी देशाच्या सीमेवर असलेल्या जवानांसाठी राख्या तयार करून दिल्या आहेत. जुळे सोलापूर बहुउद्देशीय समाजसेवा संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील ३0 शाळांमधून १ लाख राख्या संकलित झाल्या असून, त्या सर्व राख्या जवानांना पोहोचविल्या जाणार आहेत. 

बहीण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे राखीपौर्णिमा़ म्हणजे प्रत्येक बहीण आपल्या घरात भावाला राखी बांधून साजरी करते, मात्र देशाच्या रक्षणासाठी २४ तास सीमेवर तैनात असलेल्या जवानांना याची उणीव भासू नये म्हणून जुळे सोलापूर बहुउद्देशीय समाजसेवा संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रदीप तडकल व सचिव पल्लवी तडकल यांनी हा उपक्रम हाती घेतला होता.

विद्यार्थिनींनी स्वत:च्या हाताने घरात राख्या तयार केल्या. या राख्यांवर आपला संदेश देत भावना व्यक्त केल्या आहेत. या राख्या १४ आॅगस्ट रोजी ९ बटालियनचे कर्नल प्रमोदकुमार रावत, कर्नल सुधीर शर्मा यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. यावेळी शांती इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ए.जी. पाटील उपस्थित राहणार आहेत.  राख्या अहमदनगर येथील लष्करी कॅम्प  नंतर पुणे येथील लष्करी कॅम्पमध्ये जाऊन तेथून सीमेवरील १ लाख जवानांपर्यंत पोहचणार आहेत. 

सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना हे सैनिक राखीपौर्णिमेच्या सणाला येऊ शकत नाहीत. सीमेवर आपले रक्षण करणाºया भावाला उदंड आयुष्य लाभावे म्हणून विद्यार्थिनींनी मनापासून राख्या तयार केल्या आहेत. या राख्या जवानांपर्यंत पोहोचविण्याचे काम संस्थेमार्फत करीत आहोत. -पल्लवी तडकल, सचिव, जुळे सोलापूर बहुउद्देशीय समाजसेवा संस्था, सोलापूर. 

टॅग्स :SolapurसोलापूरRakhiराखी