शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीसाठीचे कर्मचारी दोन दिवस रामवाडीतच मुक्कामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 15:59 IST

सोलापूर, माढा लोकसभेतील मतदानाची उद्या मतमोजणी 

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीतील मतमोजणीतील प्रत्येक फेरीचा निकाल निवडणूक आयोगाच्या सुविधा अ‍ॅपवर कर्मचाºयांना द्यावा लागणारप्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील मतदानाच्या स्लिपांचीही मोजणी करावी लागणार

सोलापूर : सोलापूरमाढा या दोन्ही लोकसभा निवडणुकीतील मतदानाची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. सोलापुरातील रामवाडी गोदामात यासाठी मतमोजणी कर्मचाºयांना सकाळी सहा वाजताच उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे मोजणी प्रक्रियेतील सुमारे दीड हजार कर्मचाºयांचा दोन दिवस मुक्काम रामवाडी गोदामाच्या परिसरातच राहणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी करणारे कर्मचारी आज बुधवारी सायंकाळी सोलापुरात मुक्कामासाठी येत आहेत. 

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी सर्व विभागातील सुमारे अडीच हजार कर्मचाºयांचा ताफा असणार आहे. सोलापूर शहराबाहेर राहणाºया कर्मचाºयांना मतमोजणीच्या दिवशी सकाळी लवकर उपस्थित राहता यावे यासाठी रामवाडी परिसरातील केंद्रीय विद्यालय व अन्य एका खासगी मंगल कार्यालयात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीतील प्रत्येक फेरीचा निकाल निवडणूक आयोगाच्या सुविधा अ‍ॅपवर कर्मचाºयांना द्यावा लागणार आहे. याशिवाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील मतदानाच्या स्लिपांचीही मोजणी करावी लागणार आहे. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया गुरुवारी रात्रभर सुरू राहणार आहे. 

त्यामुळे या कर्मचाºयांची रात्र दुसºया दिवशीही गोदामातच जाणार आहे. त्यामुळे मतमोजणीसाठी दोन दिवस कर्मचाºयांना ठाण मांडून बसावे लागणार आहे. 

अधिकाºयांनी गोदामात ठोकला तळमतमोजणीची प्रक्रिया केवळ एक दिवसावर आल्याने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भोसले, माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे, निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांच्यासह अन्य समन्वय अधिकाºयांनी मंगळवारी सकाळपासूनच रामवाडी गोदामात तळ ठोकला आहे. मतमोजणीसाठी आवश्यक असणाºया पूर्वतयारीची रंगीत तालीम यावेळी प्रात्यक्षिकांतून घेण्यात आली. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९solapur-pcसोलापूरmadha-pcमाढा