शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Good News; उजनी ते सोलापूर पाईपलाईनसाठी तीन तालुक्यांमध्ये ड्रोनद्वारे मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:58 IST

स्मार्ट सिटीचे काम; कंपनीचे सीईओ पी. शिवशंकर यांचा निर्णय

ठळक मुद्देसमांतर पाईपलाईनच्या कामासाठी मनुष्यबळाच्या सहायाने मोजणी सुरूक्षेत्राचे व्हिडिओ शूटिंगही करण्यात आले आहे.  भरपाई देताना त्याची मदत होणारफिजिकल डिस्टन्स पाळून, लोकांची गर्दी होऊ नये अशा पध्दतीने काम सुरू

सोलापूर : उजनी ते सोलापूर समांतर पाईपलाईनच्या कामासाठी तीन तालुक्यातील जमिनीचे तात्पुरते संपादन होणार आहे. या क्षेत्राचे सीमांकन आणि गावठाण मोजण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे सीईओ पी. शिवशंकर यांनी घेतला आहे.

स्मार्ट सिटी योजना, एनटीपीसी आणि महापालिकेच्या माध्यमातून उजनी ते सोलापूर समांतर पाईपलाईनचे काम करण्यात येणार आहे. सोलापूर महापालिकेच्या जुन्या पाईपलाईनच्या बाजूनेच नवीन पाईप टाकण्यात येणार आहेत. नवी पाईपलाईन जमिनीखालून असेल. यासाठी उत्तर सोलापूर, मोहोळ आणि माढा तालुक्यातील क्षेत्राचे तात्पुरते संपादन होणार आहे. उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तीन तालुक्यातील क्षेत्राची फेब्रुवारी महिन्यात मोजणी सुरू झाली. मार्च महिन्यात बहुतांश काम पूर्ण होत असताना लॉकडाऊन जाहीर झाले. तीन महिने बंद असलेली मोजणी चार दिवसांपूर्वी सुरू झाली आहे.

यादरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत जुन्या पध्दतीने सीमांकन निश्चित करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने काम करावे, अशी सीईओ पी. शिवशंकर यांनी मांडली. जुन्या पध्दतीने काम केल्यास बराच उशीर लागतो. काही त्रुटी राहू शकतात. ड्रोनद्वारे मोजणी केल्यास कमी कालावधीत जास्त काम होईल. एका दिवसांत एका गावातील मोजणी पूर्ण होऊ शकते. त्यामुळे तसा नवा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले. 

शिवशंकर यांचा परभणी पॅटर्नसंगणक अभियंता असलेले पी. शिवशंकर परभणीचे जिल्हाधिकारी होते. खाण उद्योगातील अवैध प्रकार रोखण्यासाठी त्यांनी खाणींची ड्रोनद्वारे मोजणी करून घेतली होती. यातून नेमकी किती खोलवर खोदाई झाली, याची माहिती समोर आली होती. आता समांतर पाईपलाईनचे काम करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने ड्रोनची खरेदी करावी. हा ड्रोन आगामी काळात महापालिकेतील विविध कामांसाठी वापरता येईल. पाईपलाईनच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात एखाद्या व्यक्तीचे सहकार्य घेता येईल. त्यानंतर महापालिकेतील कर्मचाºयांना प्रशिक्षित केले जाणार आहे.

शेतकºयांना बजावल्या नोटिसासमांतर पाईपलाईनच्या कामासाठी मनुष्यबळाच्या सहायाने मोजणी सुरू झाली आहे. यापूर्वी क्षेत्राचे व्हिडिओ शूटिंगही करण्यात आले आहे.  भरपाई देताना त्याची मदत होणार आहे. यासंदर्भात शेतकºयांना नोटिसा देण्यात येत आहेत. फिजिकल डिस्टन्स पाळून, लोकांची गर्दी होऊ नये अशा पध्दतीने काम सुरू असल्याचे उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकUjine Damउजनी धरणSmart Cityस्मार्ट सिटीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका