कुर्डूवाडीत कापसाच्या मिलला आग; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:53+5:302021-02-05T06:46:53+5:30

येथील नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाला तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नांमूळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार येथील ...

Cotton mill fire in Kurduwadi; Loss of millions | कुर्डूवाडीत कापसाच्या मिलला आग; लाखोंचे नुकसान

कुर्डूवाडीत कापसाच्या मिलला आग; लाखोंचे नुकसान

येथील नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाला तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नांमूळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार येथील एमआयडीमध्ये सुशील इंडस्ट्रीज ही कापसाची जिनिंग, प्रेसिंग आणि ऑईल मिल आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता मिलमधील दोन नंबरच्या मशीनवर कापसामधील सर्की वेगळी करुन प्रेसिंग करण्याचे काम चालू होते. अचानक कापसाच्या गाठीला आग लागली. शार्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

अग्निशामक दलाचे जवान हजर झाल्यानंंतर दोन तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश मिळाले. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत कुर्डूवाडी पोलिसांत नोंद झाली नव्हती.

----

अग्निशमन यंत्राचा वापर पडला तकलादू

आग लागल्यावेळी व्यवस्थापक नागनाथ गात व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मिलमधील अग्निशमन यंत्राद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु आगीचे लोळ मोठे असल्याने ती आटोक्यात येऊ शकली नाही. प्रयत्न तकलादू ठरले. कुर्डूवाडी नगरपालिकेला आग लागल्याच्या एका तासानंतर फोन करुन आग लागल्याचे सांगितले. यावेळी संबंधित माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे सिद्धेश्वर गोफणे, बंडू जाधव, अविनाश गोडगे, सुजित बागल लागलीच घटनास्थळावर अग्निशामक बंब घेऊन हजर झाले.

----

फोटो ओळ-

कुर्डूवाडी एमआयडीसीमधील कापसाच्या जिनिग मिलला आग लागल्यानंतर विझवताना नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान व मिलचे कर्मचारी.

----

Web Title: Cotton mill fire in Kurduwadi; Loss of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.