शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांना जीवदान; सोलापुरात उभारतेय प्लाझ्मा दान चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:17 IST

महापौरांसह १५ जणांची संमती; ४३ जणांनी केले दान; ४३ पिशव्यांचा साठा

ठळक मुद्देकोरोनातून बरे झाल्यानंतर २८ दिवसांनी प्लाझ्मा दान करता येतोदान करणाºया व्यक्तीच्या शरीरातून एकूण रक्तसाठ्यापैकी २५ टक्के रक्त घेतले जातेहा प्लाझ्मा वर्षभर साठा करून ठेवला जातो़ गरज पडल्यास संबंधित रुग्णाला तो प्लाझ्मा दिला जातो

सोलापूर : कोरोनाबाधितांना वाचविण्यासाठी भारतीय जैन संघटना आणि अन्य काही जणांनी प्लाझ्मा थेरपीला प्रोत्साहन दिले आहे़ ही संघटना आणि शासकीय रुग्णालय यांच्या माध्यमातून कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा संकलित केले आहे़ मागील काही दिवसांत ४३ पिशव्या प्लाझ्मांचा साठा केला आहे.

१५ दिवसांत कोरोनातून बरे होऊन परतलेल्यांकडून प्लाझ्मा घेण्यासाठी संमतीपत्र भरून घेऊन चळवळ उभारली आहे़ आतापर्यंत महापौर  श्रीकांचना यन्नम आणि महापालिकेचे सहआयुक्त धनराज पांडे यांच्यासह १५ लोकांनी स्वत: प्लाझ्मा देण्याला संमती दिली आहे़ तसेच भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून विभागीय अध्यक्ष श्याम पाटील हे पहिले दानशूर पुढे आले़ तो प्लाझ्मा घेत असताना एका रक्ताच्या पिशवीवर दहा हजारांचे किट वापरले जात आहे.

कसे केले जाते प्लाझ्मा दान 

  • - कोरोनाबाधित व्यक्ती आजारातून बरी होऊन बाहेर पडते तेव्हा त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार होतात़ कोरोनातून बरे झाल्यानंतर २८ दिवसांनी प्लाझ्मा दान करता येतो.
  • - असा दाता १८ ते ५५ वयोगटातील आहे का ते पाहिले जाते़ इतर आजार आणि व्यसन त्याला नसावेत.
  • - दान करणाºया व्यक्तीच्या शरीरातून एकूण रक्तसाठ्यापैकी २५ टक्के रक्त घेतले जाते़ त्यावर प्रक्रिया करून प्लाझ्मा काढला जातो़ अशाप्रकारे त्याच्या शरीरातून चारवेळा रक्त काढून प्रक्रिया करून तेच रक्त पुन्हा त्याच्या शरीरात चढवले जाते.
  • - हा प्लाझ्मा वर्षभर साठा करून ठेवला जातो़ गरज पडल्यास संबंधित रुग्णाला तो प्लाझ्मा दिला जातो.

सोलापुरात मागील काही दिवसांत ४३ लोकांचे प्लाझ्मा जमा केले आहेत़ मात्र त्याचा वापर करता येत नव्हता़ प्लाझ्मा वापरण्याबाबत नागपूर शासकीय रुग्णालयातील डॉ़ फैजल यांचे नियंत्रण आहे़ त्यांनी दोन दिवसांपूर्वी तो रुग्णासाठी वापरण्याला परवानगी दिली आहे़ या प्लाझ्मावर प्लॅटीना ट्रायल करून तो वापरात येणार आहे़ - डॉ. शुभलक्ष्मी जैयस्वाल प्रभारी अधिष्ठाता, शासकीय रु ग्णालय, सोलापूर

कोरोनातून बरे झालेल्या अनेकांशी संपर्क साधून भारतीय जैन संघटनेने प्लाझ्मा थेरपी समजावून सांगितली़ प्लाझ्मा माध्यमातून अनेकांचा जीव वाचवू शकतो़ या दानाबाबत जवळपास १५ जणांकडून संमतीपत्र घेतले आहे़ शहरातून ५०० आणि ग्रमीण भागातून ५०० पिशव्या प्लाझ्मा जमवणार आहे़ संपूर्ण राज्यात पाच हजार प्लाझ्मा जमा करणार आहोत़ - केतन शहा राज्य उपाध्यक्ष, भारतीय जैन संघटना

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीयHealthआरोग्य