कोरोनाचा कहर..ऊनाची काहिली करमाळावासीयांचे जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:22 IST2021-04-01T04:22:40+5:302021-04-01T04:22:40+5:30
गेल्या चार-पाच दिवसापासुन करमाळा तालुक्यात उन्हाचा पारा ३९ अंशावर जाऊन पोहचला आहे. दुपारी बारा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत कडक ...

कोरोनाचा कहर..ऊनाची काहिली करमाळावासीयांचे जनजीवन विस्कळीत
गेल्या चार-पाच दिवसापासुन करमाळा तालुक्यात उन्हाचा पारा ३९ अंशावर जाऊन पोहचला आहे. दुपारी बारा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत कडक ऊन पडत असल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत बनले आहे. रस्ते निर्मनुष्य होत असून, व्यापारपेठेत ग्राहक येत नसल्याने व्यापाऱ्यांचा धंदा मंदावला आहे. शेतीची कामे दुपारी थांबवावी लागत आहेत. अडत बाजारात धान्याची चढ-उतार मंदावली आहे तर बांधकामवरील मजुर दुपारी काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
वाढत्या उन्हामुळे अनेकजण घरीच राहणे पसंत करीत आहेत. थंडपेयाची सेवन करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. गेल्या आठवडयात अचानक अभाळ येऊन अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणातील उकाडयात वाढ झाली आहे. एकदम कडक उन्हाळा व अवकाळी पाऊस पडल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
----