उत्तर तालुक्यात कोरोनाचा कहर होतोय कमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:28 IST2021-04-30T04:28:05+5:302021-04-30T04:28:05+5:30
उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ, वडाळा, रानमसले, गुळवंची, डोणगाव, बाणेगाव, अकोलेकाटी, मार्डी, बेलाटी व कौठाळी येथे मागील तीन दिवस ...

उत्तर तालुक्यात कोरोनाचा कहर होतोय कमी!
उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ, वडाळा, रानमसले, गुळवंची, डोणगाव, बाणेगाव, अकोलेकाटी, मार्डी, बेलाटी व कौठाळी येथे मागील तीन दिवस रॅपिड व आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. मंगळवारी १३६ पैकी २६ , बुधवारी ९७ पैकी २० तर गुरुवारी ६९ पैकी ६ व्यक्ती पाॅझिटिव्ह निघाले. मात्र, १० दिवसांत तपासणी झालेल्या आरटीपीसीआरचे अहवाल उशिराने येत आहेत व त्यामध्ये पाॅझिटिव्ह व्यक्तींची संख्या अधिक आहे. गुरुवारी आरटीपीसीआरच्या अहवालामुळे ६७ रुग्ण वाढले आहेत.
----
बीबीदारफळमध्ये सुधारणा
मार्च महिन्यात १०३ रॅपिड तपासणीत अवघे ५ व्यक्ती तर एप्रिल महिन्यात २७८ तपासणीत ११२ व्यक्ती पाॅझिटिव्ह निघाले. मात्र तीन दिवसांत झालेल्या ६४ तपासणीत अवघी एक व्यक्ती पाॅझिटिव्ह आली.
----प्रशासनाच्या केवळ गप्पाच
कोरोनाचा कहर माजल्याने बीबीदारफळ, कळमण, वडाळा, नान्नज येथे कोविड सेंटर सुरू करणार असे सांगितले. बीबीदारफळमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने घरोघरी तपासणीसाठी पथके तयार केल्याचे सांगितले. मात्र, गुरुवारपर्यंत पथक दिसली नाहीत.
----