शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

कोरोनाचा फटका; सोलापूर महानगरपालिकेचे उत्पन्न ४० कोटींनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:10 IST

महसूली उत्पन्नात झाली मोठी घट; उपाययोजनांवरील खर्चही वाढतोय

ठळक मुद्देयंदाच्या प्रशासकीय अंदाजपत्रकात १५० कोटी रुपयांची वाढ दाखवून सभागृहात सादर करण्याचे नियोजनकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वकाही बिघडले. आता प्रथम सर्वसाधारण सभा घेऊ त्यानंतर सर्व पदाधिकाºयांशी चर्चा यंदा १५ आॅगस्ट उजाडण्याची वेळ आली तरी साधी मनपाची सर्वसाधारण सभा घेण्याचे नियोजन झाले नाही

राकेश कदम 

सोलापूर : कोरोना विषाणूचा फटका महापालिकेच्या तिजोरीलाही बसला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत गेल्या चार महिन्यांत पालिकेच्या महसुली उत्पन्नात ४० कोटी रुपयांची घट दिसून येत आहे. दुसरीकडे कोरोना उपाययोजनांवरील खर्चही वाढत आहे.

एप्रिल २०१९ मध्ये विविध १७ विभागांमधून ३ कोटी ७७ लाख ३९ हजार ४६ रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदाच्या एप्रिल महिन्यात केवळ चार लाख १६ हजार १८५ रुपये उत्पन्न मिळाले. मे महिन्यात मुद्रांक शुल्क अनुदानातून १ कोटी ९७ लाख रुपये मिळाले. शहर आणि हद्दवाढ भागातील नागरिकांना कर आकारणी बिले मिळाली नसतानाही त्यांनी २ कोटी ९ लाख रुपयांचा करभरणा केला. त्यामुळे मनपाच्या तिजोरीला काहीसा दिलासा मिळाला.

मागील वर्षी जुलै अखेर मनपाला महसुली उत्पन्नातून ५० कोटी ९२ लाख ७ हजार ९० रुपये मिळाले होते. यंदा १० कोटी २८ लाख ९३ हजार ६४१ रुपये मिळाले आहेत. भूमी व मालमत्ता, मंडई, उद्यान आदी विभागांकडून गेल्या चार महिन्यांत काहीच उत्पन्न मिळाले नाही. जीएसटी अनुदानापोटी दरमहा १९ कोटी १३ लाख रुपये मिळत आहेत. त्यावरच पालिकेचा गाडा तग धरून आहे.

महिना     वर्ष २०१९     वर्ष २०२०

  • एप्रिल     ३ कोटी ७७ लाख ३९ हजार ४६     ४ लाख १६ हजार १८५
  • मे     ५ कोटी ८९ लाख १५ हजार ५९५     ५ कोटी ८ लाख ७८ हजार १९७
  • जून     ११ कोटी ५ लाख ८६ हजार १०३     १ कोटी ३८ लाख ७५ हजार ४९
  • जुलै     ३० कोटी १९ लाख ६६ हजार ३४६     ३ कोटी ७७ लाख २४ हजार २१०

अंदाजपत्रकाचा पत्ता नाही, म्हणे भांडवली निधी द्याप्रशासनाने यावर्षी ७०४ कोटी २१ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सभागृहाला सादर केले. महापालिकेचे अंदाजपत्रक मार्चऐवजी जूननंतर मंजूर करण्याची वाईट प्रथा गेल्या तीन वर्षात रुढ झाली आहे. यंदा १५ आॅगस्ट उजाडण्याची वेळ आली तरी साधी मनपाची सर्वसाधारण सभा घेण्याचे नियोजन झाले नाही. 

यंदाच्या प्रशासकीय अंदाजपत्रकात १५० कोटी रुपयांची वाढ दाखवून सभागृहात सादर करण्याचे नियोजन झाले होते. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वकाही बिघडले. आता प्रथम सर्वसाधारण सभा घेऊ. त्यानंतर सर्व पदाधिकाºयांशी चर्चा करून अंदाजपत्रक वेळेत सादर करण्याची तयारी करू.- श्रीनिवास करली, सभागृह नेता, मनपा.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका