कोरोनाने घेतला एकाच कुटुंबातील दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:21 IST2021-05-23T04:21:58+5:302021-05-23T04:21:58+5:30

यानंतर २१ एप्रिल रोजी नागटिळक कुटुंबातील सर्वांची कोरोना तपासणी केली होती. यावेळी ११ जण पॉझिटिव्ह निघाले होते. त्याचबरोबर २६ ...

Corona was the victim of two members of the same family | कोरोनाने घेतला एकाच कुटुंबातील दोघांचा बळी

कोरोनाने घेतला एकाच कुटुंबातील दोघांचा बळी

यानंतर २१ एप्रिल रोजी नागटिळक कुटुंबातील सर्वांची कोरोना तपासणी केली होती. यावेळी ११ जण पॉझिटिव्ह निघाले होते. त्याचबरोबर २६ एप्रिल रोजी संतोष नागटिळक यांची कोरोना तपासणी केली होती. ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले. संतोष नागटिळक यांना उपचारासाठी पंढरपूर येथील रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यामुळे ३ मे रोजी त्यांना अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तब्बल १९ दिवस उपचार सुरू असताना २२ मे रोजी नागटिळक कुटुंबातील संतोष बबन नागटिळक (वय ४२) यांनी अखेरचा श्वास घेतला.

एकाच कुटुंबातील वडील बबन नागटिळक व मुलगा संतोष नागटिळक हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील बळी ठरले. यामुळे संपूर्ण सुस्ते परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोष नागटिळक यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. ते दूध पंढरीत पर्यवेक्षक पदावर कार्यरत होते.

Web Title: Corona was the victim of two members of the same family