शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

आषाढी वारी नियोजनावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:21 IST

चैत्र शुद्ध दशमीची बैठक रद्द : आगामी काळातील परिस्थिती पाहूनच बैठकीचा निर्णय

ठळक मुद्देआषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी मानाच्या प्रमुख ९ पालख्या आहेतसध्या एका ठिकाणी जमाव करण्यास बंदी असल्याने पालखी सोहळा रद्दयंदाचा आषाढी सोहळा खंडित होण्याची भीती वारकरी व महाराज मंडळींमध्ये

पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळ्यासाठी मानाच्या नऊ प्रमुख पालख्यांसह दोन हजारांच्या आसपास दिंड्या प्रवास करुन पंढरपुराकडे येत असतात. यामुळे प्रशासनाला अडीच महिन्यांपासून नियोजन करावे लागते. परंतु सध्या कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे.  आषाढी सोहळ्यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. यामुळे चैत्री यात्रेप्रमाणे आषाढी यात्रा बैठकीवरही कोरोना रोगाचे सावट असल्याचे दिसून येत आहे.

आषाढी पायी यात्रेच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात चैत्र शुध्द दशमीला श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, दिंडी समाज संघटनेच्या वतीने बैठक घेण्यात येते. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, शितोळे सरकार, आरफळकर मालक, ह. भ. प. वासकर महाराज, चोपदार, सर्व फड व दिंडीप्रमुख उपस्थित असतात. परंतु यावर्षी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे चैत्र शुध्द दशमीला होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. पुढील परिस्थिती पाहून आषाढी नियोजनाची बैठक घेण्यात येणार असल्याचे श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, दिंडी समाज संघटनेचे सदस्य ह.भ.प. देविदास महाराज ढवळीकर यांनी सांगितले.

यंदा कोरोना या साथीच्या रोगाचे संकट असून, त्यातच महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे़ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन केले आहे. सध्या तरी लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत आहे. परंतु या रोगाचा प्रसार कमी झाला नाही तर आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनासह पालखी, दिंडीप्रमुखांना आषाढीची तयारी करायला जमणार नाही. यामुळे यंदाचा आषाढी सोहळा खंडित होण्याची भीती वारकरी व महाराज मंडळींमध्ये आहे.

प्रमुख ९ पालख्यांसह असतात लाखो भाविक- आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी मानाच्या प्रमुख ९ पालख्या आहेत. यामध्ये श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, श्रीसंत तुकाराम महाराज, श्रीसंत मुक्ताबाई, श्रीसंत सोपान महाराज, श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज, श्रीसंत एकनाथ महाराज, श्रीसंत नामदेव महाराज, श्रीसंत गजानन महाराज, श्रीसंत निळोबाराय महाराज आदी पालख्या प्रमुख आहेत. या पालख्यांबरोबर लाखो वारकरी असतात. परंतु सध्या एका ठिकाणी जमाव करण्यास बंदी असल्याने पालखी सोहळा रद्द होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस