शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

सोलापुरात कोरोनाचे रूग्ण पुन्हा वाढले, १८ रूग्णांना केले घरातच विलगीकरण

By appasaheb.patil | Updated: March 10, 2023 19:09 IST

सोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली कोरोनाची रूग्णसंख्या अचानक वाढली. मागील दोन ते तीन दिवसात १८ रूग्ण आढळून आले ...

सोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली कोरोनाची रूग्णसंख्या अचानक वाढली. मागील दोन ते तीन दिवसात १८ रूग्ण आढळून आले असून या रूग्णांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात कोरोना रूग्णांची संख्या वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, गुरूवारी एकूण ४३ जणांची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. त्यात २ लोक पॉझिटिव्ह आढळून आले. सध्या रॅपिड ॲन्टीजेन व आरटीपीसीआर टेस्टव्दारे तपासणी करण्यात येत आहे. वयोगटानुसार १६ ते ३० वयोगटातील १ तर ६० पेक्षा अधिक वय असलेला एक जण शुक्रवारी कोरोना बाधित झाला. घरात विलगीकरण असलेल्या रूग्णांची संख्या १८ आहे असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.

सणासुदीच्या काळात कोरोनाचे रूग्ण वाढू शकतात. व्हायरल इनफेक्शनच्या नावे जो संसर्ग रूग्णांना होऊ शकतो तो कोरोनाचाही व्हायरस असू शकतो, कारण व्हायरस कधीही मरत नाही. कोरोना संसर्ग पुन्हा वाढला तरीही मृत्यूंचं प्रमाण कमी असेल तसंच रूग्णालयात रूग्णांना दाखल करण्याचंही प्रमाण कमी असेल मात्र लोकांनी काळजी घेतली पाहिजे. कोरोना संपला आहे या भ्रमात राहू नये असंही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

शहरातील कोरोना रूग्णसंख्येच्या आकडेवारीवर एक नजर..आजपर्यंतचे पॉझिटिव्ह बाधित रूग्ण - ३४ हजार ५५९, आजपर्यंत मृतांची संख्या - १ हजार ५१६, शहरातील बाधित असलेले रूग्ण - १८रूग्णालयातून बरे होऊन गेलेले रूग्ण - ३३ हजार २५   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSolapurसोलापूर