शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे पल्स-ऑक्सिमीटरशी सोलापूरकरांची दोस्ती वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 16:34 IST

अशीही जागरुकता : घरच्या घरी कधी अन् केव्हाही तपासणी

ठळक मुद्देज्यांच्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत, ते आवर्जून पल्स ऑक्सिमीटर घरात ठेवत आहेतसर्वसामान्य नागरिकांमधूनही पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्याचे प्रमाण वाढत आहेकाही नागरिक बाहेर जातेवेळेस कायम खिशात पल्स ऑक्सिमीटर घेऊन फिरताना दिसत आहे

सोलापूर : शहर अन् जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. कोरोनाचा आजार कधी अन् केव्हा आपल्याला होईल, ही भीतीही प्रत्येक जण बाळगून आहेत. शरीरातील ऑक्सिजन कमी झाले की स्थिर आहे याविषयी जो-तो अ‍ॅलर्ट आहे. म्हणूनच खिशात सहजपणे बसेल असे पल्स ऑक्सिमीटरबरोबर दोस्ताना वाढला आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता आली असून, ऑक्सिमीटरची मागणी चांगलीच वाढली आहे. 

ज्यांच्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत, ते आवर्जून पल्स ऑक्सिमीटर घरात ठेवत आहेत. डॉक्टरांबरोबरच, व्यापारी, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, महाविद्यालये, संस्था, कार्यालये, उद्योगधंदे आणि सर्वसामान्य नागरिकांमधूनही पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्याचे प्रमाण वाढत आहे. काही नागरिक बाहेर जातेवेळेस कायम खिशात पल्स ऑक्सिमीटर घेऊन फिरताना दिसत आहेत.कोरोना रुग्णाव्यतिरिक्त कोरोना नसलेले लोकही घरी तापमान आणि आॅक्सिजन स्तर मोजण्यासाठी पल्स आॅक्सिमीटर आणि थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन) या दोन्ही उपकरणांची खरेदी करीत आहेत. हे उपकरण कंपनीनुसार ७०० ते १००० रुपयांत बाजारात सहजरीत्या उपलब्ध आहे. याशिवाय थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन) १५०० ते ३००० रुपयांपर्यंत विक्रीस आहेत. मागणीपेक्षा जास्त स्टॉक उपलब्ध आहेत. 

असा होतो वापरव्यक्तीच्या शरीरात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण हे ९२ टक्क्यांपेक्षा जास्त दाखवत असेल तर कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही; मात्र ९२ किंवा ९० पेक्षा कमी असेल तर श्वसनाचा त्रास त्यांना संशयित समजलं जातं अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तर थर्मल स्कॅनरमध्ये तापमान ३५ ते ३७ असेल तर साधारण समजले जाते आणि ३८ ते ४० असेल तर उच्च तापमान असते. सध्याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्येकाच्या घरी पल्स ऑक्सिमीटर असणे आवश्यक असे तज्ज्ञाचे मत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधं