शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

कोपर्डी अत्याचार प्रकरण : ११ आॅक्टोबरपासून अंतिम युक्तिवाद - उज्ज्वल निकम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 6:22 PM

 पंढरपूर, दि. 17 - कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील पुराव्याचे संपूर्ण काम संपले आहे़ त्यामुळे ११ आक्टोबरपासून अंतिम युक्तीवाद सुरु होईल़ त्यानंतर लवकरच निकाल लागेल, असा विश्वास या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला. पंढरपूर येथे खाजगी कामानिमित्त आले असता शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.कोपर्डी प्रकरणातील ...

 पंढरपूर, दि. 17 - कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील पुराव्याचे संपूर्ण काम संपले आहे़ त्यामुळे ११ आक्टोबरपासून अंतिम युक्तीवाद सुरु होईल़ त्यानंतर लवकरच निकाल लागेल, असा विश्वास या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला. पंढरपूर येथे खाजगी कामानिमित्त आले असता शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोपर्डी प्रकरणातील आरोपींच्या बचाव साक्षीदाराची सरकारच्या बाजुची उलट तपासणी पूर्ण झाली आहे. या तपासणीत बचाव साक्षीदाराने कोपर्डी अत्याचाराविरोधात निघालेल्या मराठा मोर्चातील मागण्यांना आपला कोणतीही विरोध नसल्याचे कबूल केले आहे, असा गौप्यस्फोट उज्ज्वल निकम यांनी केला. त्यामुळे बचाव पक्षाच्या साक्षीदारानेच आरोपींना मराठी मोर्चातील फाशीच्या मागणीला विरोध नसल्याचे यावरुन दिसून येतेे. 

कोपर्डी प्रकरणाचा निकाल लागण्यास उशीर झाल्याचे मान्य करून उज्ज्वल निकम म्हणाले, मात्र अशा संवेदनशील प्रकरणामध्ये कोणामुळे उशीर होतो याचे आॅडीट होणे गरजेचे आहे़ तसे झाल्यास न्याय लवकर मिळेल आणि जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास वाढेल़ तसेच ज्यांनी विलंब केला त्यांना त्याचे कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, याची तरतूद करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पाकिस्तानने केला न्यायालयाचा अपमान

भारतीय नौसेनेचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताने फाशीची शिक्षा सुनावली, मात्र या निकालावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली़ त्यानंतरही पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना आणि भारत सरकारच्या प्रतिनिधीला त्यांना भेटू दिले नाही. यावरून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अपमान करीत आहे, असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले़

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाCourtन्यायालय