शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठाचा मंगळवारी दीक्षांत समारंभ; १२ हजार २३९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 13:26 IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार समारंभ; 62 पीएच.डी पदवी तर 55 सुवर्णपदकाचेही वितरण होणार

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सतरावा दीक्षांत समारंभ मंगळवार, दि. 11 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता कोविड विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. यावेळी एकूण 12 हजार 239 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. याचबरोबर 62 विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 55 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. कोविड विषाणूमुळे शासनाकडून जारी करण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करून विद्यापीठाचा हा दीक्षांत समारंभ ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपस्थित राहूनच पदवी ग्रहण करावे लागणार आहे. यामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव विज्ञान विद्याशाखा, आंतर विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  

यंदा 62 जणांना पीएच.डी पदवी प्रदान केली जाणार आहे. पीएचडी पदवी प्राप्त करण्यामध्ये 38 मुले तर 24 मुलींचा समावेश आहे. त्याचबरोबर यंदा 55 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. विविध विषयात गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून सुवर्णपदक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. अशा एकूण 55 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये 16 मुले तर 39 मुलींचा समावेश आहे.

राज्यपालांच्या हस्ते बारा जणांना सन्मानमहामहिम राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आयोजित 17 व्या दीक्षांत समारंभात 8 सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना तर 4 पीएचडी पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. चारही विद्याशाखेतील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. हा सोहळा विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात सर्व नियमांचे पालन 50 व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन व https://youtu.be/pSobXUz-V5o या युट्युब लिंकवरून थेट प्रक्षेपण होणार आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने पदवी संपादन करीत असल्याचे यावेळी राज्यपाल श्री कोश्यारी हे जाहीर करणार आहेत. त्यांना महाविद्यालयाच्या माध्यमातून नंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेस प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर आदी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीEducationशिक्षण