शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठाचा १९ जानेवारीला दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 13:26 IST

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा चौदावा दीक्षांत समारंभ १९ जानेवारी २०१९ रोजी  दीक्षांत मंडपात होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी ...

ठळक मुद्देनवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे हे उपस्थित राहणार डॉ. सहस्रबुद्धे हे मूळचे हुबळी, कर्नाटकचे असून, ते गेल्या ३५ वर्षांपासून अभियांत्रिकी, वैज्ञानिक क्षेत्रात कार्यरत मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार

सोलापूर : सोलापूरविद्यापीठाचा चौदावा दीक्षांत समारंभ १९ जानेवारी २०१९ रोजी  दीक्षांत मंडपात होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. 

 या दीक्षांत सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे यांनी सांगितले. 

यावेळी डॉ. सहस्रबुद्धे हे स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करणार आहेत. डॉ. सहस्रबुद्धे हे मूळचे हुबळी, कर्नाटकचे असून, ते गेल्या ३५ वर्षांपासून अभियांत्रिकी, वैज्ञानिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 

शासनाच्या महत्त्वाच्या विविध पदांची जबाबदारी ते यशस्वीपणे सांभाळत आहेत. प्रशासनाचाही दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ व वैज्ञानिक म्हणून ते परिचित आहेत. डॉ. सहस्रबुद्धे यांच्या रूपाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले अतिथी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला लाभणार आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरuniversityविद्यापीठEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय