शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

विहिरीवरून कोल्हे-पटेल यांच्यात वादावादी

By admin | Updated: February 3, 2015 17:35 IST

महापालिकेने अधिगृहित केलेल्या खासगी विहिरीतील पाणी जाते कोठे असा सवाल उपस्थित केल्यावर मंड्या व उद्यान सभापती फिरदोस पटेल व राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप कोल्हे यांच्यात वादावादी झाली.

 सोलापूर : महापालिकेने अधिगृहित केलेल्या खासगी विहिरीतील पाणी जाते कोठे असा सवाल उपस्थित केल्यावर मंड्या व उद्यान सभापती फिरदोस पटेल व राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप कोल्हे यांच्यात वादावादी झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी जनवात्सल्यजवळ घडला. फिरदोस पटेल यांनी २३ जानेवारी रोजी आयुक्त गुडेवार यांच्याकडे मनपात अधिगृहित केलेल्या विहिरीचे पाणी जाते कोठे अशी तक्रार केली होती. आयुक्तांनी हा अर्ज चौकशीसाठी सार्वजनिक आरोग्य अभियंता अंबऋषी रोडे यांच्याकडे दिला होता. यावरून कोल्हे यांनी आज सकाळी पटेल यांना फोन करून माझ्याविरुद्ध तक्रार करता, शिंदे साहेबांकडे या असे सुनावले. त्यामुळे पटेल या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भेटण्यासाठी जनवात्सल्यवर आल्या.पोर्चमध्ये महापौर सुशीला आबुटे, सुधीर खरटमल भेटले. त्यांच्याशी बोलत असतानाच कोल्हे आतून आले. त्यांनी पटेल यांना तक्रार अर्जाची छायांकित प्रत दाखवित मलाही तुमच्या महिला व बालकल्याण विभागातील भानगडी काढाव्या लागतील. माझ्याविरुद्ध तक्रारी करता, हा प्रश्न आता आमच्या पक्ष बैठकीत मांडतो असे सुनावले. यावरून दोघात खडाजंगी झाली. त्यानंतर सायंकाळी पटेल यांनी गुडेवार यांची भेट घेऊन तक्रार केलेला अर्ज दुसरीकडे गेलाच कसा असा सवाल उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य अभियंत्याची चौकशी सुरू केली आहे. पटेल यांच्या तक्रारीनुसार सन २0१२ मध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्यावर शहरातील ११ विहिरी अधिगृहित करण्यात आल्या. या विहिरीतील पाणी वापरण्यासाठी दीड कोटीचा डीपीआर तयार करण्यात आला. विहिरीतील गाळ काढून फिल्टर प्लान्ट बसवून पाणीपुरवठय़ाचा ठेका देण्यात आला. ठेकेदाराने अर्धवट काम करून ६४ लाख उकळले. यातून प्रभार २८ ब मधील जुनी लक्ष्मी मिल चाळ येथील विहिरीचा गाळ काढून योजना सुरू केली. पण ही योजना महापालिकेच्या ताब्यात नाही. खासगी वितरणासाठी पाणी विक्री होत आहे. यासाठी किती खर्च झाला, कोणी केला व मक्ता रद्द की चालू याबाबत माहिती मिळविण्यासाठी पटेल यांनी अर्ज दिला होता. या अर्जावर सार्वजनिक आरोग्य विभागाने माहिती न देता दुसर्‍यांना छायांकित प्रत पुरविली. ही बाब गंभीर असल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)