कुर्डूवाडीत दूषित पाणीपुरवठा, मुख्याधिकारी म्हणतात, मी काय करू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:22 IST2021-09-03T04:22:37+5:302021-09-03T04:22:37+5:30

सध्याच्या पावसामुळे उजनी धरणात वरून येणाऱ्या पाण्यामुळे धरणाचे पाणी प्रदूषित झाले आहे. ते पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा कुर्डूवाडी नगर ...

Contaminated water supply in Kurduwadi, chief says, what should I do? | कुर्डूवाडीत दूषित पाणीपुरवठा, मुख्याधिकारी म्हणतात, मी काय करू?

कुर्डूवाडीत दूषित पाणीपुरवठा, मुख्याधिकारी म्हणतात, मी काय करू?

सध्याच्या पावसामुळे उजनी धरणात वरून येणाऱ्या पाण्यामुळे धरणाचे पाणी प्रदूषित झाले आहे. ते पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा कुर्डूवाडी नगर परिषदेकडे आहे. पाणी फिल्टर करून सोडण्यात येत असल्याची माहिती एकीकडे नगर परिषद प्रशासन देत असले तरी दीड कोटी रुपये खर्चून उभारलेली पाणी फिल्टरेशन यंत्रणा सध्यातरी कोलमडली आहे. शहराला दररोज पिवळसर पाणीपुरवठा होत आहे. प्रभारी मुख्याधिकारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे शहराला दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप थेट नागरिकांमधून होत आहे.

शहराला सध्या ८ एमएलडी पाण्याची गरज आहे. जलशुद्धीकरण केंद्रात बसवलेली फिल्टरेशन व क्लोरिनेशन करणारी यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही, अशी शंका नागरिकांतून उपस्थित होत आहे. शहर परिसरातील ४ हजार ५०० कनेक्शनधारकांना ५.५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यासाठी परंडा रोड येथील १३ लाख ६३ हजार लीटर पाण्याची टाकीही आहे. तेथूनच शहरात मार्केट यार्ड, करमाळा रोड, माढा रोड, बाल उद्यान, गावठाण व माढा रोड, टेंभुर्णी रोड, आवताडे वसाहत, बार्शी नाका येथे पाणी सोडले जाते.

...................

उजनी धरणात पाणी गढूळ असल्यामुळे असे पाणी शहरात येत आहे, येथील नागरिकांनी ते स्थिर करून प्यावे. माझ्याकडे येथील प्रभारी चार्ज आहे. मी येथील हिरवट पाण्याला काहीही करू शकत नाही. नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी.

- चरण कोल्हे, प्रभारी मुख्याधिकारी, नगर परिषद

................

घरी येणाऱ्या पिण्याच्या पाण्यात क्लोरिनचा वापर होत नाही. १.५ कोटी रुपये खर्च करून नगर परिषदेने फिल्टरेशनचे काम केले. क्लोरिन नसेल तर निदान ब्लिचिंग पावडर तरी पाण्यात वापरावी. साथीचे रोग पसरू लागले आहेत. प्रभारी असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना शहराचे काही देणेघेणे नाही, असेच त्यांच्या वागण्यातून दिसत आहे.

- सुधीर मराळ, नागरिक, साई कॉलनी, कुर्डूवाडी

.................

(फोटो ३०कुर्डूवाडी दूषित पाणी

---

300821\00225840img-20210830-wa0396.jpg~300821\00275840img-20210830-wa0397.jpg

कुर्डूवाडी शहरातील पाण्याचा सोमवारचा टीडीएस~कुर्डूवाडी शहरातील पाण्याचा सोमवारचा टीडीएस

Web Title: Contaminated water supply in Kurduwadi, chief says, what should I do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.