कामावर जावावे म्हणून बांधकाम मजुराला फुकणीने मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:28 IST2021-09-16T04:28:44+5:302021-09-16T04:28:44+5:30
अक्कलकोट : बांधकाम कामावर लवकर जा म्हणत जेऊर (ता. अक्कलकोट) येथे एका बांधकाम मजुरास फुकणीने मारहाण करून जखमी केले. ...

कामावर जावावे म्हणून बांधकाम मजुराला फुकणीने मारले
अक्कलकोट : बांधकाम कामावर लवकर जा म्हणत जेऊर (ता. अक्कलकोट) येथे एका बांधकाम मजुरास फुकणीने मारहाण करून जखमी केले.
१५ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता ही घटना घडली. याबाबत दक्षिण पोलीस ठाण्यात दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, फिर्यादी सैपन फतू अत्तार (रा. हतूर, ता. दक्षिण सोलापूर, हल्ली जेऊर, ता. अक्कलकोट) हे घरात जेवण करत बसले होते. तेव्हा कामावर लवकर जा, बांधकामवरचे मिस्त्री लोक तुम्ही नाही गेल्यास काम करत नाहीत म्हणत रेश्मा सैपन अत्तार, चांदबी चांद अत्तार (दोघी रा. जेऊर, ता. अक्कलकोट) या दोघींनी लोखंडी पोकळ फुकणीने मारहाण करून शिवीगाळ केली. अधिक तपास सहायक फौजदार शंकर राठोड करीत आहेत.