बारामतीच्या धर्तीवर मंगळवेढ्यात नवीन क्रीडा संकुलाची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:36 IST2020-12-13T04:36:54+5:302020-12-13T04:36:54+5:30
मुंबई येथील सह्याद्री शासकीय विश्रामगृहामध्ये जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसपंदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ...

बारामतीच्या धर्तीवर मंगळवेढ्यात नवीन क्रीडा संकुलाची उभारणी
मुंबई येथील सह्याद्री शासकीय विश्रामगृहामध्ये जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसपंदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत तालुकानिहाय आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनिता नागणे यांनी मंगळवेढा शहरात असलेल्या शाळेच्या जागेतील क्रीडा संकुल अपुरे आणि शालेय वेळेत खेळाडूंसाठी वापरणे गैरसोयीचे ठरत आहे. स्पर्धा घेण्यासाठी मर्यादा येतात म्हणून शहरालगत असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या खुल्या जागेत सुसज्ज क्रीडा संकुल व्हावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. पवार यांनी लागलीच संबंधित विभागाला सूचना दिल्या. बारामतीच्या धर्तीवर मंगळवेढ्यात नवीन क्रीडा संकुल करण्यासंदर्भात सर्व्हे करून माहिती देण्यास सांगितले.
यावेळी लतीफ तांबोळी, शहराध्यक्ष भारत जाधव, राजेंद्र हजारे, गणेश पाटील उपस्थित होते.