काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणारच; उमेदवार काळुंगेंची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:01 PM2019-10-04T12:01:09+5:302019-10-04T12:03:13+5:30

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी देखील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घोळच

Congress will contest elections; Announcement of Candidates | काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणारच; उमेदवार काळुंगेंची घोषणा

काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणारच; उमेदवार काळुंगेंची घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देपंढरपूर विधानसभा मतदारसंघातून शिवाजी काळुंगे यांचे नाव जाहीर शिवाजी काळुंगे यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म सादर केलाएकंदरीत काळुंगे यांनी मुदतीत काँग्रेसचा एबी फॉर्म दाखल केल्याने आता राष्ट्रवादी पक्ष काय भूमिका घेणार ?

पंढरपूर :  मंगळवेढा विधानसभा मतदार संघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी देखील आघाडीच्या उमेदवारीचा घोळ अद्याप संपला नाही. काँग्रेसतर्फे शिवाजी काळुंगे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर आज सकाळी काँग्रेस पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे सुपूर्द केला आहे. यावेळेस पक्षाने मला अधिकृत उमेदवार जाहीर केले आहे त्यामुळे मी यंदा ही निवडणूक लढविणारच अशी घोषणा काँग्रेसचे उमेदवार शिवाजी काळुंगे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून आघाडीतर्फे विद्यमान काँग्रेसचे आमदार भारत भालके यांना यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून त्यांना घोषित करण्यात आले. मात्र बुधवारी रात्री काँग्रेस पक्षाने उशिरा यादी जाहीर केली या यादीमध्ये पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून शिवाजी काळुंगे यांचे नाव जाहीर झाले. त्यामुळे आघाडीतील उमेदवारांचा घोळ समोर आला. गुरुवारी भारत भालके आणि शिवाजी काळुंगे यांनी आपली उमेदवारी अर्ज सादर केले. यामध्ये शिवाजी काळुंगे यांनी काँग्रेसतर्फे अर्ज भरला. मात्र त्यांनी अधिकृत एबी फॉर्म जोडला  नसल्याने निवडणूक निर्णय अधिका?्यांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पक्षाचा अधिकृत फॉर्म जोडा असे निर्देश दिले.

त्यानुसार शिवाजी काळुंगे यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म सादर केला. त्यानंतर ना काँग्रेसचे उमेदवार शिवाजी काळुंगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला मला पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे आणि पक्षाचा एबी फॉर्म देखील मी मुदतीत निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे सुपुर्द केला आहे. असे असताना काही जण मुद्दामून मी निवडणूक लढणार नाही अशी अफवा पसरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. मात्र पक्षाने माज्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासास पात्र ठरवून ही निवडणूक लढविणार असल्याची घोषणा त्यांनी केली़ एकंदरीत काळुंगे यांनी मुदतीत काँग्रेसचा एबी फॉर्म दाखल केल्याने आता राष्ट्रवादी पक्ष काय भूमिका घेणार ? आमदार भारत भालके राष्ट्रवादीचा एबी फॉर्म मिळविण्यात सफल होतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Congress will contest elections; Announcement of Candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.