फूट टाळण्यासाठी काँग्रेसचा व्हीप
By Admin | Updated: September 2, 2014 16:35 IST2014-09-02T16:35:03+5:302014-09-02T16:35:03+5:30
महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

फूट टाळण्यासाठी काँग्रेसचा व्हीप
>सोलापूर : महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेसने सोमवारी सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन व्हीप बजावला तर राष्ट्रवादीनेही उपमहापौरपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन पक्षश्रेष्ठींकडे नावांची शिफारस पाठविली आहे. महेश कोठे यांच्या पक्षांतरामुळे या निवडणुकीत विरोधकांची सरशी होऊ नये म्हणून काँग्रेसने ही सतर्कता बाळगली असल्याचे दिसून आले.
शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी काँग्रेस व अपक्ष नगरसेवकांची काँग्रेस भवनात बैठक घेतली. पक्षीय बलाबल पाहता काँग्रेस नगरसेवकांची संख्या मोठी असल्याने महापौर काँग्रेसचा होणार आहे. पण काँग्रेसमधून नुकतेच बाहेर पडलेल्या महेश कोठे यांच्यामुळे विरोधक काही तरी दगाफटका करतील या भीतीने काँग्रेसने ही सतर्कता बाळगली आहे. कोठे बाहेर पडल्यामुळे काँग्रेसची संख्या ४५ झाली आहे. त्यात एका अपक्षाचा काँग्रेसला पाठिंबा आहे. या बैठकीला महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे, चेतन नरोटे यांची अनुपस्थिती होती. शहर अध्यक्ष यलगुलवार यांनी पक्षाचा व्हीप सर्व नगरसेवकांना सांगितला. महापौर निवड होईपर्यंत कोणीही इतर पक्षाकडून येणार्या कागदावर किंवा अन्य ठिकाणी सह्या करू नयेत. प्रत्येक जण संपर्कात राहावे. सभापतींना नगरसेवकांची जबाबदारी देण्यात आली. महापौरपद अनुसूचित जाती महिला संवर्गासाठी राखीव असल्याने इच्छुकांबाबत चर्चा झाली. त्यात सुशीला आबुटे, श्रीदेवी फुलारे, अनिता म्हेत्रे यांची नावे आघाडीवर आहेत. नरोटे यांना पक्षाचा व्हीप पाठविण्यात आला आहे.
इकडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या सूचनेवरून उपमहापौरपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. महिलांना प्राधान्य द्यावे असे गादेकर यांनी सुचित केले असले तरी नाना काळे, मनोहर सपाटे, दिलीप कोल्हे यांनी प्रवीण डोंगरे यांच्या नावाची शिफारस केली आहे. तर या पदासाठी बिस्मिला शिकलगार, सुनीता रोटे, शांताबाई दुधाळ यांनीही मुलाखती दिल्या आहेत.
मंगळवारी उमेदवारी दाखल करण्याचा दिवस आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-भाजपाने ही निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून तयारी केली आहे. महापौरपदासाठी भाजपातर्फे सुनीता गदवालकर यांची उमेदवारी दाखल करण्याची तयारी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल करण्याची मंगळवारी सकाळी ११ ते ३ मुदत आहे. त्यानंतर ६ सप्टेंबर रोजी या दोन्ही पदांची निवड होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी हे काम पाहणार आहेत.
- ए. ए. पठाण, नगरसचिव काँग्रेस भवनात नगरसेवकांची बैठक घेतली. सर्व नगरसेवकांना पक्षाचा व्हीप दिला आहे. महापौर पदासाठी इच्छुक असलेल्यांची नावे प्रदेश कार्यालयास पक्षाध्यक्षांनी पाठविली आहेत. मंगळवारी फॅक्सद्वारे कोणाचे नाव येईल त्यांची उमेदवारी दाखल करण्याची तयारी केली आहे.
- संजय हेमगड्डी , सभागृह नेते