काँग्रेस पक्ष बळकटीकरणावर भर देणार : प्रकाश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:16 IST2021-07-21T04:16:19+5:302021-07-21T04:16:19+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील व प्रा. पी.सी. झपके यांच्या नेतृत्वाखाली सांगोला शहर व ...

काँग्रेस पक्ष बळकटीकरणावर भर देणार : प्रकाश पाटील
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील व प्रा. पी.सी. झपके यांच्या नेतृत्वाखाली सांगोला शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सोमवारी आदर्श पतसंस्थेत बैठक झाली, त्यावेळी ते बाेलत होते. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सुनील भोरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष मैना बनसोडे, रवी साबळे, नागेश काकडे, एन.डी. बंडगर, ॲड. महादेव कांबळे, काशीनाथ ढोले, अवी देशमुख, कृष्णा भजनावळे, फिरोज मणेरी, सुरेश डांगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर प्रा. पी.सी. झपके, रवी साबळे, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष मैना बनसोडे, प्रा. एन.डी. बंडगर, ॲड. महादेव कांबळे आदींनी विचार व्यक्त केले.